Art Inspiration: नक्कल नको, स्वतःचा 'आवाज' शोधा! चित्रकार मनीषा पारेख यांचा प्रेरणादायी कलाप्रवास; वारसा असूनही कष्टाने सिद्ध केले वेगळेपण
esakal March 29, 2026 09:45 AM

हर्ष भटकळ, saptrang@esakal.com

कलावंत असणे ही एक आयुष्यात मिळालेली अपूर्व संधी आहे. कोणीही तशी जबरदस्ती करत नाही. पण एकदा का हा मार्ग निवडला की काही जबाबदारी येते असं मनीषा पारेख मानतात. त्यांच्या मते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचे वेगळेपण सापडणे. यशस्वी चित्रकारांप्रमाणे नक्कल करण्याचा मोह होणे साहजिकच असले तरी तुम्हाला तुमचा आवाज सापडणे हेच खरे आहे. कदाचित याला बरीच वर्षे जावी लागतील.’ यासाठी धीर धरायला हवा.

काहींना कलाविश्वाच्या जगाची जाणीव बऱ्याच उशिरा होते. मनीषा पारेख मात्र या वातावरणातच वाढत गेल्या. मनीषा पारेख यांच्या बाबतीत कला हा जीवनात अचानक प्रवेश करणारा प्रकार नव्हता. तो त्यांच्या रोजच्या जीवनाचा एक आमूलाग्र पैलू होता. एका छोट्याशा जागेत कोपऱ्यात रंग वाळायला कोलकात्याचकॅनव्हास ठेवले आहेत. लिनसिड ऑइल आणि टर्पेंटाइनचा वास हवेत दरवळत आहे. काव्य, सिनेमा यांविषयीच्या नवनव्या चर्चा रात्रभर चालत असत. ‘माझ्या सुरुवातीच्या आठवणी माझ्या आई-वडिलांना चित्रकामात गुंतलेले पाहण्याचा. आमचे घर हेच मुळी त्यांच्या कामाचा स्टुडिओ होता. त्यामुळे मी वाढले तीच कॅनव्हास, ब्रश, रंग हे सारे पाहत. या साऱ्या जणू माझ्या खेळातील वस्तू होत्या.’

मनीषा यांचा जन्म १९६४ चा. विख्यात चित्रकार मनू आणि माधवी पारेख यांचे कुटुंब कलाजगताशी अनेक बाबतींत जोडले गेले होते. मनीषाच्या बालपणाच्या काळात मनू पारेख यांचे सरकारी वीवर्स सर्विस सेंटरसोबत काम नुकतेच सुरू झाले होते. कामाच्या स्वरूपामुळे सारख्या बदल्या होत असत. मनीषाचा जन्म गुजरातमध्ये झालेला, पण लगेच मानुभाईंची कोलकता इथं बदली झाली. मनीषाचे बालपण तिथे गेले. ते कोलकता इथले दिवस त्यांना बरेच काही देऊन गेले.

कोलकता इथला कालखंड

१९६०-७० च्या काळात कोलकता इथे वातावरण सांस्कृतिक कारणांनी महत्त्वाचे होते. काव्यचर्चा नाट्यचर्चा, संगीत आणि दृश्यकला या रोजच्या जीवनाचाच भाग बनल्या होत्या. या वातावरणात वाढणे हे एका कोवळ्या मुलीसाठी फार वेगळ्या विश्वात जगणे होते. ‘घरी कवी, लेखक, चित्रकार हे जमत असत. ज्यावेळी चर्चा तापत असे तेव्हा आम्हा मुलांना घालवून देण्यात येत असे. आम्ही परततो आणि पाहतो तर घर मंत्रमुग्ध करणाऱ्या कलावंतांनी भरलेले असायचे. रोजचे जगणे साधे आणि काटकसरीचे होते. अनेक कलाकारांचा आर्थिक संघर्ष चालू असायचा पण त्यांची भरपाई सांस्कृतिक कामातील सुबत्ता भरून काढत असे. ‘मी गाण्याचे आणि नृत्याचे धडे घेत राहील याची काळजी माझे आई-वडील घेत असत. माझी आई तर मला बिर्ला अकॅडेमीत चालत नेऊन आणत असे.’ एकूण जे सांस्कृतिक वातावरण होते त्यामुळे हे कलाप्रेम वाढीला लागले. कोलकता इथं माझ्या त्या कलात्मक प्रगतीला महत्त्व होते. तुमची सांपत्तिक ऐपत किती याला महत्त्व नव्हते. तुम्ही वाचक असाल, गात असाल किंवा चित्रकार असाल तर तुम्हाला वेगळ्या अर्थाने श्रीमंत मानले जाई. हे सारे अचानक बदलले.

स्थलांतर आणि जुळवाजुळव

मनीषा नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांच्या बदलीमुळे कुटुंबाचे स्थलांतर झाले, आधी मेरठला आणि नंतर दिल्लीला. कोलकता इथं संस्कृतीला उत्तेजन देणाऱ्या वातावरणात वाढलेल्या मनीषासाठी हा बदल कठीण होता. काही वर्षांतच तीन जागी बदली झाली आणि त्यांच्या शाळा तीनदा बदलल्या. तरी तो अनुभवही काही शिकवून गेला. ‘आता विचार केला तर त्यामुळे माझी आयुष्यातल्या बदलांना सामोरे जायची ताकद वाढली. नवीन अनुभव स्वीकारण्याचे शिक्षण मिळत होते.’ त्यांची जडणघडण जरी कलाकार कुटुंबात झाली तरी आपण काही विलक्षण प्रतिभावंत आहोत, असा त्यांचा दावा नाही. ‘मी एक सामान्य मुलगी आहे. माझ्याहून अधिक चांगले चित्र काढणाऱ्या मुली वर्गात असायच्या.’ पण मनीषाकडे वेगळे काहीतरी होते ते म्हणजे चिकाटी. ‘मी आज जे काय करू शकते ते निर्धारपूर्वक दीर्घ कष्टामुळे; माझ्यातील प्रतिभेमुळे नव्हे.’

संगीत, हस्तकौशल्य आणि परंपरा

त्या शाळेत असताना संगीताचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. मी शास्त्रीय संगीताची साधना करत होते. नाद आणि लय या माझ्या जाणिवेत रुतून बसल्या नंतर मात्र माझ्या लक्षात आले की संगीतासाठी लागणारी संवेदनशीलता, लय, ठेहराव, चलनवलन या साऱ्या गोष्टींना दृश्यकलेतही स्थान आहे. त्याच वेळी त्यांना आपल्या नाभिक कुटुंबाच्या इतिहासाची जाणीव झाली. ‘नाभिक हाताने काम करतात हे माझ्या परंपरेत बसते.’ या व्यवसायाला लागणारे हस्तकौशल्य निरनिराळी हत्यारे आणि सामान नाजूकपणे वापरण्याचे कसब हे अनपेक्षित मार्गाने त्यांच्यापुढे येऊ लागले. ‘हाताने काम करणे हे मला सहज शक्य वाटू लागले.’ त्या म्हणाल्या. लिहिणे आणि भाषा हे काही त्यांच्या ताकदीचे विषय नव्हते. नंतर कधी तरी त्यांच्या लक्षात आले की त्या वाचन लेखनाच्या बाबतीत गतिमंद होत्या. त्यापेक्षा प्रत्यक्ष हाताने करायचे काम त्यांच्या सोयीचे होते.x

स्थलांतर आणि जुळवाजुळव

मनीषा नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांच्या बदलीमुळे कुटुंबाचे स्थलांतर झाले, आधी मेरठला आणि नंतर दिल्लीला. कोलकता इथं संस्कृतीला उत्तेजन देणाऱ्या वातावरणात वाढलेल्या मनीषासाठी हा बदल कठीण होता. काही वर्षांतच तीन जागी बदली झाली आणि त्यांच्या शाळा तीनदा बदलल्या. तरी तो अनुभवही काही शिकवून गेला. ‘आता विचार केला तर त्यामुळे माझी आयुष्यातल्या बदलांना सामोरे जायची ताकद वाढली. नवीन अनुभव स्वीकारण्याचे शिक्षण मिळत होते.’ त्यांची जडणघडण जरी कलाकार कुटुंबात झाली तरी आपण काही विलक्षण प्रतिभावंत आहोत, असा त्यांचा दावा नाही. ‘मी एक सामान्य मुलगी आहे. माझ्याहून अधिक चांगले चित्र काढणाऱ्या मुली वर्गात असायच्या.’ पण मनीषाकडे वेगळे काहीतरी होते ते म्हणजे चिकाटी. ‘मी आज जे काय करू शकते ते निर्धारपूर्वक दीर्घ कष्टामुळे; माझ्यातील प्रतिभेमुळे नव्हे.’

संगीत, हस्तकौशल्य आणि परंपरा

त्या शाळेत असताना संगीताचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. मी शास्त्रीय संगीताची साधना करत होते. नाद आणि लय या माझ्या जाणिवेत रुतून बसल्या नंतर मात्र माझ्या लक्षात आले की संगीतासाठी लागणारी संवेदनशीलता, लय, ठेहराव, चलनवलन या साऱ्या गोष्टींना दृश्यकलेतही स्थान आहे. त्याच वेळी त्यांना आपल्या नाभिक कुटुंबाच्या इतिहासाची जाणीव झाली. ‘नाभिक हाताने काम करतात हे माझ्या परंपरेत बसते.’ या व्यवसायाला लागणारे हस्तकौशल्य निरनिराळी हत्यारे आणि सामान नाजूकपणे वापरण्याचे कसब हे अनपेक्षित मार्गाने त्यांच्यापुढे येऊ लागले. ‘हाताने काम करणे हे मला सहज शक्य वाटू लागले.’ त्या म्हणाल्या. लिहिणे आणि भाषा हे काही त्यांच्या ताकदीचे विषय नव्हते. नंतर कधी तरी त्यांच्या लक्षात आले की त्या वाचन लेखनाच्या बाबतीत गतिमंद होत्या. त्यापेक्षा प्रत्यक्ष हाताने करायचे काम त्यांच्या सोयीचे होते.

बडोद्यातील दिवस

शालेय शिक्षण झाल्यावर त्या बडोद्याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीच्या कला विभागात दाखल झाल्या. ही तर कलेच्या क्षेत्रात देशातील सर्वांत नावाजलेली अशी शिक्षणसंस्था आहे. त्या शिक्षणाने त्यांच्यातील कलाकार घडवला. तेथील अध्यापक फक्त शैक्षणिक विचार करणारे नव्हते तर स्वतः मोठे निष्ठावंत कलाकार होते. त्यांना अध्यापन हे एक पवित्र कार्य वाटत असे. ‘ही मंडळी अत्यंत साधेपणाने राहत.’ मनीषा म्हणाल्या, ‘अध्यापक आपले ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला आतुर असत. नसरीन मोहमदी या त्यापैकी एक.’ त्यांचा प्रभाव मनीषा यांच्या विचारसरणीवर अजूनही दिसतो. नसरीन मोहमदी ह्या फाउंडेशन कोर्स शिकवत असत. विद्यार्थ्यांना मूलभूत कलात्मक नजर प्राप्त करून देणे हे त्या काही उदाहरणातून दाखवत असत. ‘‘त्या अगदी साधे साधे प्रश्न विचारत; ‘तुम्हाला जसे वस्तूंचे स्थिरचित्रण काढायचे असेल त्या चित्रातील संतुलन उभे ठेवाल की आडवे?’’ किंवा ‘चित्रात मोकळी जागा कुठे ठेवाल?’ ‘तुम्ही काढलेल्या चित्रांचे आणि मोकळ्या जागेचे नाते कोणते?’’’

या साध्या वाटणाऱ्या सरावामुळे विद्यार्थी मूलगामी विचार करू लागत. कसे पाहायचे ह्या सबंधी. विद्यार्थ्यांना निसर्गाचे निरीक्षण करण्याचे उत्तेजन दिले जाई. ‘तुम्हाला जर एखाद्या वृक्षाचा अभ्यास करायचा असेल तर त्याच्या पानावर उजेड कसा पडतो, त्याच्या फांद्या कशा पसरतात, दिवसभरात सावली कशी बदलत राहते. या साऱ्या गोष्टींमुळे निरीक्षणशक्ती तल्लख होते.’ त्या तरुण वयात मनीषा यांना नसरीन मोहमदी यांच्या या क्षुल्लक वाटणाऱ्या तात्त्विक विचाराचे महत्त्व लक्षात येत नसे. ‘पण अनेक वर्षानंतर त्यांच्या शिकवण्याचे मर्म माझ्या लक्षात आले. जीवन आणि कला यांच्यातील संबंध दाखवायचे.’

तिथले दुसरे महत्त्वाचे शिक्षक होते गुलाम महम्मद शेख ते पेंटिंगची कहाणी असा विषय शिकवत. त्यांची कथनशैली विलक्षण होती. त्यांच्या शिकवणीतून ते गतकाळातील अनेक संस्कृती जिवंत करत. त्या काळात बडोदे हे जसे लहान शहर होते हे बरेच! ‘तिथे लक्ष विचलित करणाऱ्या फार गोष्टी नव्हत्या. अभ्यासावर पूर्ण लक्ष देता येत असे.’

स्वतःचा शोध

गंमत म्हणजे मनीषा यांनी लगेच ॲबस्ट्रॅक्ट (अमूर्त) चित्रे काढण्याकडे नजर वळवली नाही. त्यांच्या सुरुवातीच्या पेंटिंग्जमध्ये आकार दिसतात. बडोद्यात त्यावेळी प्रचलित असलेल्या कथनात्मक शैलीचा त्यावर प्रभाव होता. पण ते अपुरे वाटू लागले. ‘माझ्या लक्षात आले की माझ्या नजरेसमोर नेहमीच काही निश्चित दिसत नसे, पण मला कॅनव्हास सिद्ध करून रंग मिसळणे, साहित्य हाताळणे यात रस वाटत असे.’ विद्यार्थीदशेत त्यांनी केलेल्या पेंटिंगमध्ये ही द्विधा मनःस्थिती अचूकपणे पाहायला मिळते. त्यात स्टुडिओमध्ये रिकामा कॅनव्हास हाताळताना दिसत आहेत. त्या पेंटिंगचे शीर्षकच मुळी ‘आय डोन्ट नो व्हॉट टु पेंट’ या अनिश्चितेमुळे त्यांचे लक्ष अमूर्त विषयांकडे वळले. त्या या प्रक्रियेला ‘सहयोगी प्रतिमा’ म्हणतात. ‘माझे काम पूर्णपणे निराकार आहे असे मला वाटत नाही. ते सारे पाहिलेल्या जगाच्या स्मरणातून आणि अनुभवातून आलेले असते. त्यामुळे त्यामागे इतर काही संदर्भ असतो.’ त्या ही प्रक्रिया संगीताच्या अनुभवाशी जोडू पाहतात. ‘तुम्हाला जरी बंदिशीतील शब्द कळले नाहीत तरी त्यातील भावना भिडू शकते. मला अशा अनुभवात रुची आहे.’

लंडनचा विशाल प्रभाव

बडोद्याहून त्या इनलॅक्स शिष्यवृत्ती मिळवून लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये शिकायला गेल्या. येथील अनुभव सर्वस्वी वेगळा होता. ‘१९९० च्या सुमारास इंटरनेटचा संदर्भ नव्हता. आपल्या देशात मिळणारे पाश्चात्त्य कलाक्षेत्राचे ज्ञान हे दशकानुदशके कालबाह्य झालेले असायचे. लंडनमधले वास्तव्याचे दिवस म्हणजे म्युझियम आणि आर्ट गॅलरीज यामधून कलेतिहास समकालीन अनुभवणे असे होते. या कलाकृती प्रत्यक्षात पाहणे हे त्या पुस्तकातून पाहण्यापेक्षा वेगळेच होते. ‘मी नतमस्तक होत असे.’ रॉयल कॉलेजमध्ये शिकवण्याची पद्धती फार वेगळी होती. तिथे पूर्णवेळ शिकवणारे होते त्याशिवाय व्यावसायिक चित्रकार नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात घेऊन यायचे. त्यांच्या समोरचे प्रश्न आमच्या समस्यांसारखेच असायचे. त्यामुळे चर्चा अर्थपूर्ण होत असे. दुसरा भाग म्हणजे अविष्काराचा. ‘लंडनमध्ये आम्ही आमच्या कल्पनांना आणि विचारांना स्पष्ट शब्दांत मांडता यावे अशी अपेक्षा असायची.’ भारतात चित्रकारांना आपल्या कलेबद्दल स्वतःच्या कामाचे विश्लेषण करण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही. स्वतःच्या कामाबद्दल काटेकोरपणे विचार करणे याचा मनीषाच्या कलात्मक प्रगतीला हातभार लागायचा.

कलाकाराची ओळख

भारतात परतल्यावर त्यांच्यापुढे एक अपेक्षित आव्हान उभे राहिले. तिचे दोन्ही पालक हे प्रस्थापित चित्रकार आहेत अशा तरुण मुलीने स्वतःला कसे सिद्ध करावे? मनीषाने एक साधा स्वतंत्र मार्ग निवडला. ‘मी माझ्या आई-वडिलांच्या प्रदर्शनात भाग घेतला नाही. मला माझे काम हे स्वतंत्रपणे दाखवायचं होते. ‘घरी सारे नेहमीप्रमाणेच होते. माझे आई-वडील हे मोठे कलावंत खरे पण ते माझे पालकही होते.’ त्या हसत म्हणाल्या ‘घरी आमचा संवाद साध्यासुध्या घरगुती गोष्टीबद्दलच असायचा.’ त्यांचे वडील मनुभाई यांना मुलीच्या स्वतंत्र व्यक्तित्वाबद्दल आदरच आहे. ‘त्यांनी मला माझा स्वतंत्र कलात्मक मार्ग शोधायला मोकळीक दिली.’

स्वतःची ओळख

मनीषा पारेख यांच्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केलेला वेगवेगळ्या वस्तूंचा आणि सामानांचा उपयोग. त्यांनी जेव्हा चित्रे काढायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या कामाचे स्वरूप बदलत गेले. कागदाचे वेगवेगळे कलाप्रकार, इन्स्टॉलेशन आणि शिल्पकला याचा प्रवेश झाला. ‘मला निरनिराळ्या सामानांचे आकर्षण वाटते.’ ग्रॅफाईट, चारकोल, वॉटर कलर या प्रत्येक माध्यमाची तऱ्हा वेगळी. ग्रॅफाइटच्या कामात मऊपणा लागतो. चारकोलने जर काळा रंग दाट व्हायचा तर काही दबाव लागतो. वॉटर कलर कामात लालित्य आहे.’ ही विशेषता लक्षात घेणे हे मनीषाच्या कलात्मक आयुष्याचा भाग आहे. नंतरच्या काळात कागदाच्या प्रयोगाकडून त्या धातूच्या पत्र्याकडे पोहोचल्या. पारंपरिक काम करणाऱ्यांसोबत धातूचे पत्रे, तांबे आणि लोखंडी पत्रे ठोकून नाजूक वस्तू बनवू लागल्या. या प्रक्रियेतून रोजच्या व्यवहारातील वस्तू तयार झाल्या. ‘आपल्या स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू या धातू ठोकून किंवा त्यांना छिद्रे पाडून वापरल्या जातात. मला त्याचे फार आकर्षण वाटते.’ धातू हळूहळू वेगवेगळी रूपे घेतो. तांबे हिरवे पडते तर लोखंडावर गंज चढतो. ‘मी जणू त्या धातू सोबत संवाद साधते.’

एकरंगी आणि बहुरंगी

अनेक वर्षे मनीषा यांचे काम हे एका रंगात चाले, प्रामुख्याने कृष्णधवल. त्यात काही सूक्ष्म छटा त्या दाखवायच्या. याची सुरुवात त्या लंडनला असताना. ‘त्यानंतर माझ्या कामाचे स्वरूप अचानक बदलले. माझ्या शरीरातील आकृत्या नाहीशा झाल्या आणि त्याची जागा वस्तूने घेतली. बाथटब, हॅट्स, पादत्राणेसुद्धा.’ या स्थित्यंतरात रंगांना फारसे स्थान नव्हते. कृष्णधवल चित्रात त्या आकार आणि संदर्भ यावर लक्ष पुरवू लागल्या. इतर कलावंत आणि त्यांचे अध्यापक नसरीन मोहमदी आणि झरीना हाश्मी यांचा या थोडक्यात बरेच काही सांगण्याच्या शक्तीला पाठिंबा होता.

परंतु कोविडच्या दिवसांत अनपेक्षित असा बदल झाला. ‘मी पुन्हा रंगकाम करू लागले.’ त्यांच्या नंतरच्या प्रदर्शनात लाल आणि इतर भडक रंग दिसतात. ‘मला वाटतं की त्या खडतर काळात रंगामुळे एक नवीन आशा दिसू लागली.’ तरी त्या कृष्णधवल आणि बहुरंगी या दोन्ही माध्यमात काम करत आहेत. ‘मी तो लंबकासारखा दुहेरी प्रवास आहे.’

उपदेशाचे दोन शब्द

होतकरू कलाकारांना काय सांगाल असे विचारल्यावर त्या थबकल्या. मग त्या साधेपणाने म्हणाल्या, ‘कलावंत असणे ही एक आयुष्यात मिळालेली अपूर्व संधी आहे.’ कोणीही तशी जबरदस्ती करत नाही. पण एकदा का हा मार्ग निवडला की काही जबाबदारी येते. ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचे वेगळेपण सापडणे. यशस्वी चित्रकारांप्रमाणे नक्कल करण्याचा मोह होणे साहजिकच असले तरी तुम्हाला तुमचा आवाज सापडणे हेच खरे आहे. कदाचित याला बरीच वर्षे जावी लागतील.’ यासाठी धीर धरायला हवा. पण कलाकारांचे हे मुख्य काम असते असे त्या मानतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.