-सनील गाडेकर
पुणे : होळीच्या सणानिमित्त गावी गेलेले अनेक कामगार अद्याप पुण्यात परतलेले नाहीत. त्यातच जे काही कामगार शहरात परतले आहेत, तेही गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने पुन्हा गावाकडे जाण्याचा निर्णय घेत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात मजुरांची कमतरता निर्माण झाली असून, उत्पादनावर त्याचा थेट परिणाम झाला आहे.\
Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ चे काम पूर्ण; 'या' दिवशी होणार खुला, प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी वाचणार!औद्योगिक भागांमध्ये काम करणारे बहुतांश कामगार हे परराज्य किंवा ग्रामीण भागातून आलेले असतात. होळीच्या सुट्टीनंतर ते परतण्याची अपेक्षा असताना यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. अनेक कामगार गावाकडेच थांबले असून, जे काही परतले आहेत त्यांना दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेले गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरात राहणे कठीण होत असल्याने ते पुन्हा गावी परतण्याचा पर्याय निवडत आहेत. परराज्यातून आलेल्या कामगारांची संख्या यात मोठी आहे. कामगारांची संख्या कमी झाल्याने अनेक उद्योग निम्म्या क्षमतेनेच सुरू आहेत. उत्पादनाचे वेळापत्रक बिघडत असून ऑर्डर पूर्ण करण्यात विलंब होत आहे. विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांना याचा मोठा फटका बसत आहे.\
कामगारांच्या जेवणाची सोयउद्योजकांनी पुढाकार घेत कामगारांना थांबवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कामगार पुन्हा गावाकडे जाऊ नयेत यासाठी उत्पादन क्षेत्रातच त्यांची जेवणाची सोय करण्यात येत आहे. दिवसातून दोन वेळचे अन्न उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे, ज्यामुळे गॅस सिलिंडरच्या अभावामुळे निर्माण होणारी अडचण कमी होईल. काही ठिकाणी राहण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
मी होळीला गावाला गेलो होतो आणि काही दिवसांनी परत पुण्यात आलो. पण इथे आल्यावर सर्वात मोठी अडचण गॅस सिलिंडरची निर्माण झाली. दोन-दोन दिवस जेवण बनवता येत नव्हते तसेच बाहेर खाणे महाग पडते. अशा परिस्थितीत इथे राहणे कठीण होते, म्हणून पुन्हा गावाकडे जाण्याचा विचार करत आहे.
- संतोष यादव, उत्तर प्रदेशातील एक कामगार\
राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश.. उद्योजकांना दुहेरी फटकाउद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती ही केवळ स्थानिक अडचणींमुळे नसून आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही त्यावर परिणाम होत आहे. अमेरिका, इराण आणि इस्राईल यांच्यातील तणावामुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. परिणामी उद्योगांना वाढत्या खर्चाचा आणि कमी उत्पादनाचा दुहेरी फटका बसत आहे.