Pune News: नंबरप्लेट काढून अवजड वाहनांची सर्रास वाहतूक; डेक्कन, शिवाजीनगर, कोथरूडमध्ये नियमांचे उल्लंघन; प्रशासनाचे दुर्लक्ष
esakal March 29, 2026 01:45 PM

शिवाजीनगर: डेक्कन, शिवाजीनगर, कोथरूड, एरंडवणे परिसरात विविध सोसायट्यांच्या पुनर्विकासाची कामे गतीने सुरू आहेत. त्यामुळे जुन्या इमारतीचे पाडकाम झाल्यावर राडारोडा घेऊन जाणे आणि बांधकामासाठी लोखंडी साहित्य, दगड, माती, वीटा, सिमेंट घेऊन येण्यासाठी अवजड वाहनाचा वापर केला जातो. मात्र, सकाळच्या वेळेत या अवजड वाहतुकीला बंदी असतानाही या परिसरांमधील रस्त्यांवर अनेक डंपर दिसून येतात.

विधी महाविद्यालय रस्त्यावरील आठवले चौकात शुक्रवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता नंबर प्लेट नसलेला डंपर एका खाजगी बांधकाम साइटवर राडारोडा भरत होता. सकाळच्या वेळेत हा डंपर वाहतूक नियंत्रक दिवा यंत्रणेजवळ वाहतुकीस अडथळा ठरेल, अशा प्रकारे उभा केलेला होता.

Pune News: खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांमुळे कोथरूडमध्ये कोंडी; बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा; अतिक्रमणाविरोधात आंदोलनाचा इशारा

डंपर, सिमेंट काँक्रीट मिक्सर, ट्रक अशी जड वाहने शहरात ठराविक वेळेत घेऊन येण्यास बंदी आहे. तरी देखील ती कोणत्याही वेळेला शहरात फिरताना दिसतात. मागील आठवड्यात अवजड वाहनांच्या नंबरप्लेटला चिखल-माती लावणे, महापालिका, पुणे मेट्रोच्या नावाचे कागद चिकटवून खाजगी बांधकामाचे साहित्य आणण्यासाठी त्यांचा वापर करण्याचा प्रकार दिसून आला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ही धोकादायक वाहतूक नियमित सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Success Story: जिद्द, कष्ट आणि ध्येयवेड! ओमकार पेटेकर बनला डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश, विद्यार्थ्यांसाठी सुयश प्रेरणादायी..

"या वाहनावर कारवाई करून दोन हजार रूपये दंड आकारला आहे. कोथरूड, चतुःश्रृंगी वाहतूक विभागालाही कारवाई करण्यास कळविले आहे. दुपारी एक ते चार आणि रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेतच जड वाहनांना परवानगी आहे."

- राहुल गैाड, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग डेक्कन

"शाळा, महाविद्यालय, कार्यालयीन वेळेत बंदी असताना देखील विनापरवाना धोकादायक पद्धतीने रस्त्यावर डंपर चालविले जातात. अनेक चालक अपरात्री मद्यपान करून वेगाने जड वाहने चालवितात."

- सचिन पायगुडे, रहिवासी, डेक्कन

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.