Sambhajinagar shooting news : छत्रपती संभाजीनगर शहरातील एन-६ सिडको परिसरातील साईनगर येथे शनिवारी रात्री उशिरा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. समीर नाईक (वय ३१) या तरुणाच्या राहत्या घरातच ही घटना घडली असून गोळी कानाजवळून डोक्याच्या आरपार गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. समीरने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेनंतर जखमी समीरला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयातदाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
समीर नाईक हा आई आणि लहान भावासोबत साईनगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. त्याची आई बजरंग चौकात बांगड्यांचे दुकान चालवते, तर समीर पौरोहित्याचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होता.
Chhatrapati Sambhajinagar: एमआयटी पॉलिटेक्निकच्या ३९ विद्यार्थ्यांना मासो ऑटोमोटिव्हमध्ये ट्रेनी इंजिनिअर म्हणून नोकरी;पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांचे करिअर यशशनिवारी सायंकाळी समीरची आई नेहमीप्रमाणे दुकानात गेल्यानंतर तो घरी एकटाच होता. काही वेळाने त्याचा लहान भाऊ घरी परतला असता समीर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या शेजारी पिस्तूलहीआढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पिस्तूल जप्त केले असून नेमकी घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे. आत्महत्येचा प्रयत्न की अन्य काही कारण आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.