Vaibhav Suryavanshi ची राजस्थान रॉयल्सच्या संघसहकाऱ्यांना मोठ्ठी बर्थडे पार्टी; बिल बघून म्हणाला, 'खूपच महाग आहे, पण...',
esakal March 29, 2026 04:45 PM

Vaibhav Sooryavanshi Marathi News: राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यंवशींने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याने २७ मार्च रोजी त्याचा १५ वा वाढदिवस राजस्थान रॉयल्स संघासोबत साजरा केला आहे. २८ मार्चपासून आयपीएलच्या १९ व्या हंगामाला सुरुवात झाल्याने वैभवगेल्या काही दिवसांपासून राजस्थान रॉयल्ससोबत आहे. तो संघासोबत कसून सराव करत आहे.

याचदरम्यान त्याने राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) संघसहकाऱ्यांना वाढदिवसाची ग्रँड पार्टीही दिली. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यानचा व्हिडिओही व्हायरल (Video Viral) झाला आहे.

Vaibhav Suryavanshi: हम पहला ही उड़ा देंगे… राहुल द्रविडशी पहिल्याच भेटीत काय म्हणालेला वैभव? सॅमसनने केली पोलखोल; Video

वैभव आयपीएलमधील (IPL) सर्वात लहान खेळाडू आहे. तो राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडू आणि इतर सदस्यांसोबत मस्तीही घालताना दिसतो. यादरम्यान त्याने त्याच्या १५ व्या वाढदिवसाची पार्टी मोठी दिल्याने त्याचे बिलही मोठे होते.

सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात दिसतंय की राजस्थानमधीलएक सदस्य वैभवला पार्टीसाठी धन्यवाद म्हणत आहे. त्यावेळी वैभव म्हणतो की 'खूप महाग आहे, पण काय करणार मॅनेज करावं लागतं. बघ ना किती जणांना पार्टी द्यावी लागत आहे, पण मॅनेज करावं लागतं.'

दरम्यान, वैभव सूर्यवंशीचा वाढदिवसाचा एक गमतीशीर व्हिडिओही राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यात तो त्याच्या चेहऱ्याला केक लावतील म्हणून ड्रेसिंग रुममध्ये येण्यास नकार देताना दिसतोय. वैभव राजस्थान रॉयल्स संघातील महत्त्वाचा फलंदाज आहे.

त्याने गेल्यावर्षीही त्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. त्याने गेल्यावर्षी गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतकही केले होते. तसेच नुकतेच काही महिन्यांपूर्वी त्याने १९ वर्षांखालील भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे त्याच्याकडून अशाच चांगल्या खेळाची आता राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२६ मध्येही अपेक्षा असणार आहे.

वैभवसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे उघडणार

वैभव सूर्यवंशीने आता १५ वा वाढदिवस साजरा केला असल्याने त्याच्यासाठी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे खुले झाले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमानुसार वयाच्या १५ व्या वर्षानंतर खेळाडू राष्ट्रीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतात.

त्यामुळे आता वैभवचाही भारतीय संघातील निवडीसाठी विचार केला जाऊ शकतो. यामुळे आता काही दिवसात वैभव भारतीय संघाकडूनही खेळताना दिसू शकतो. जर त्याने १५ व्या वर्षीच आता आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, तर तो भारतासाठी खेळणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू असेल.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

वैभव सूर्यवंशीने आत्तापर्यंत वरिष्ठ स्तरावर ८ प्रथम श्रेणी सामने खेळले असून २०७ धावा केल्या आहेत. त्याने ८ लिस्ट ए क्रिकेटमध्ये ८ सामन्यांत ३५३ धावा केल्या आहेत. त्याने १८ टी२० सामने खेळले असून ३ शतकांसह ७०१ धावा केल्या आहेत. यात आयपीएलमधील ७ सामन्यांचा समावेश असून त्याने त्यात २५२ धावा केल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.