'कदाचित तिचा फोन नंबर आता तो...' एक्स गर्लफ्रेंडबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले...
esakal March 29, 2026 04:45 PM

NANA PATEKAR TALKS ABOUT MANISHA KOIRALA: प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी 90 च्या दशकामध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. नानांनी अग्नीसाक्षी, खामोशी सारख्या सिनेमामधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. नानासोबतच मनीषा कोईराला हिला सुद्धा प्रेक्षकांना डोक्यावर घेतलं. याच वेळी नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांची जोडी खऱ्या आयुष्यातही प्रेमात पडली होती. परंतु काही कारणास्तव दोघांचं नातं संपुष्टात आलं.

नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी युग पुरुष, खामोशी, अग्नीसाक्षी या सिनेमामध्ये एकत्र काम केलं होतं. परंतु 1996 मध्ये अग्नीसाक्षी सिनेमाच्या शुटिगवेळी त्यांचं नात संपुष्टात आलं. मनीषा कोईराला नानांने विवाहित असणं आणि अभिनेत्री आयशा जुल्काबरोबर वाढलेली जवळीक मनीषाला आवडली नाही. त्यामुळे त्यांचं नातं संपुष्टात आलं. जेव्हा नाना मनीषाच्या प्रेमात होते, तेव्हा ते पत्नी नीलकांतीपासून वेगळे राहत होते.

'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकरांनी एक्स गर्लफ्रेंड मनीषा कोईरालाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'महान अभिनेत्री तिला खूप कमी वयात कर्करोग झाला होता. तू 'हीरामंडी' पाहिलीस का? त्यात तिने खुप छान काम केलं होतं.'

View this post on Instagram

A post shared by Ultra Play (@ultraplayott)