नाशिक - भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.
खरात यांच्या ‘श्री शिवनिका संस्थान’मध्ये विश्वस्त म्हणून काम करणाऱ्या चाकणकरयांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही महिला नेत्यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे चाकणकर यांना प्रथम महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
Ashok Kharat: आपल्यावर कुणी हात घालू शकतो त्याने विचार केला नव्हता, पण... पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी सांगितला अटकेचा थरार सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशीसूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक (एसआयटी) आता शिवनिका संस्थानच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी करणार आहे. संस्थेच्या सर्व व्यवहार, आर्थिक उलाढाली आणि निर्णयप्रक्रिया एसआयटीच्या रडारवर आल्या आहेत. चाकणकर यांच्यासह अन्य विश्वस्तांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
राजकीय वर्तुळात खळबळखरात यांच्या फार्महाऊस आणि कार्यालयात लपविलेले कॅमेरे, महिलांचे अश्लील व्हिडिओ आणि अनेक महिलांचा कथित शोषणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रकरण चांगलेच तापले आहे. चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
संपूर्ण साखळी उलगडण्याचा प्रयत्नएसआयटी आता संपूर्ण साखळी उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. शिवनिका संस्थानशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची भूमिका तपासली जाणार असून, चाकणकर यांचीही प्रत्यक्ष चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Ashok Kharat: “तू दिसायला सुंदर… तुझा पती तुला समजून घेत नाही”; अशोक खरात महिलांना कशी घालायचा भुरळ? चौकशीत धक्कादायक खुलासा