MI vs KKR Live: मुंबई इंडियन्सचा भारी विक्रम... ठरली जगातील पहिली फ्रँचायझी; पाकिस्तानचा विक्रम आता संकटात
esakal March 29, 2026 11:45 PM

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Marathi Update: पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससंघाने आयपीएल २०२६ मध्ये क्रिकेटच्या इतिहासात एक नवीन सुवर्णाक्षरांनी लिहिलेला अध्याय जोडला आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३०० सामने खेळणारी मुंबई इंडियन्स ही जगातील पहिली आयपीएल फ्रँचायझी बनली आहे. या ऐतिहासिक टप्प्यामुळे मुंबई इंडियन्स आता पाकिस्तान राष्ट्रीय संघ आणि इंग्लंडच्या सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लबच्या जागतिक विक्रमाच्या अतिशय जवळ पोहोचली आहे.

२००८ मध्ये आयपीएलची सुरुवात झाल्यापासून मुंबई इंडियन्सने सातत्याने आपली छाप सोडली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावणाऱ्या या संघाने आता ३०० सामन्यांचा पल्ला गाठून आपली सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली आहे. या ३०० सामन्यांमध्ये आयपीएलच्या सामन्यांसोबतच आता बंद पडलेल्या 'चॅम्पियन्स लीग टी-२०' (CLT20) च्या सामन्यांचाही समावेश आहे, जिथे मुंबईने दोनदा विजेतेपद पटकावले होते.

MI vs KKR Live: मुंबई इंडियन्सच्या Playing XI मध्ये तिघांचे पदार्पण! जसप्रीतबाबत महत्त्वाचे अपडेट्स... सूर्यकुमार यादव ११ मधून बाहेर

मुंबई इंडियन्सच्या या प्रवासात अनेक दिग्गजांचा वाटा आहे. सचिन तेंडुलकर, लसिथ मलिंगा, कीरॉन पोलार्ड आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांनी या संघाला एका नव्या उंचीवर पोहोचवले आहे. मुंबई इंडियन्स ३०० ट्वेंटी-२० सामने खेळणारी पहिली फ्रँचायझी ठरली आहे. या विक्रमात पाकिस्तान व सॉमरसेट हे प्रत्येकी ३०३ सामन्यांसह अव्वल आहेत. हॅम्पशायर ( २९६) व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( २८७) यांचा MI नंतर क्रमांक येतो.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर KKR विरुद्ध नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघ आजच्या सामन्यात ६ गोलंदाज व ५ फलंदाजांसह मैदानावर उतरले आहेत. मुंबईच्या संघाकडून शार्दूल ठाकूर, अल्लाह घझनफार व शेरफाने रुथरफोर्ड यांनी पदार्पण केले आहे. सूर्यकुमार यादव इम्पॅक्ट प्लेअर्सच्या यादीत आहे.

Big Blow : महेंद्रसिंग धोनीनंतर CSK चा आणखी एक मॅच फिनिशर झाला जखमी, २-३ सामन्यांना मुकणार; IPL 2026 मध्ये उद्या RR ला भिडणार

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शेरफाने रुथरफोर्ड, नमन धीर, शार्दूल ठाकूर, मयांक मार्कंडे, अल्लाह घझनफर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह. IMPACT PLAYER - सूर्यकुमार यादव, कॉर्बिन बॉशन, रॉबिन मिंझ, राझ अंगद बावा, अश्वनी कुमार

कोलकाता नाइट रायडर्स - फिन अॅलन, अजिंक्य रहाणे, कॅमेरून ग्रीन, अंगकृश रघुवंशी, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अनुकूल रॉय, सुनील नरीन, वरुण चक्रवर्थी, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझारबानी, इम्पॅक्ट प्लेअर - मनिष पांडे, रोव्हमन पॉवेल, कार्तिक त्यागी, सौरभ दुबे, तेजस्वी दहिया

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.