MI vs KKR : अजिंक्य रहाणेची जबरदस्त सुरुवात, लोकल बॉयचं पलटण विरुद्ध चाबूक अर्धशतक
GH News March 30, 2026 12:10 AM

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमात जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. रहाणेने या मोहिमेतील आपल्या पहिल्याच सामन्यात तसेच घरच्या मैदानात माजी संघाविरुद्ध चाबूक अर्धशतक झळकावलं आहे. लोकल बॉय अजिंक्यने वानखेडे स्टेडियममध्ये मुबई इंडियन्स विरुद्ध अर्धशतक ठोकून आपण फॉर्मेटनुसार खेळू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं आहे. अजिंक्य टी 20 फॉर्मेटनुसार वेगाने खेळू शकत नाही, असं म्हणत त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र रहाणेने दणदणीत खेळी करुन टीकाकाराना चोख उत्तर दिलंय.

अजिंक्यचं चाबूक अर्धशतक

मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. केकेआरच्या अजिंक्य आणि फिन एलन या सलामी जोडीने पहिले बॅटिंग करण्याच्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. या दोघांनी 69 धावांची जबरदस्त सलामी भागीदारी केली. केकेआरने फिनच्या रुपात पहिली विकेट गमावली. फिनने 37 धावा केल्या. त्यानंतर कॅमरुन ग्रीन याच्या रुपात केकेआरने दुसरी विकेट गमावली. ग्रीनने 18 धावांचं योगदान दिलं.

केकेआरने अप्रतिम सुरुवातीनंतर 2 विकेट्स गमावले. मात्र रहाणेने एक बाजू लावून धरली. रहाणेने या दरम्यान 10 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर अर्धशतक पूर्ण केलं. रहाणेने 27 बॉलमध्ये 188.89 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं. अजिंक्यचं 19 व्या पर्वातील पहिलं, मुंबई विरुद्धचं सहावं आणि एकूण 34 वं अर्धशतक ठरलं. अजिंक्यने या खेळीदरम्यान 4 षटकार आणि 3 चौकार लगावले.

अजिंक्यच्या पहिल्या सामन्याक किती धावा?

अजिंक्य अर्धशतकानंतर हा तडाखा असाच कायम ठेवत चौफेर फटकेबाजी करत होता. त्यामुळे अजिंक्यला शतकाची संधी होती. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळणाऱ्या सहकारी शार्दुल ठाकुर याने अजिंक्यचा गेम केला. शार्दुलने अजिंक्यला 14 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं. अजिंक्यने 40 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह एकूण 67 धावा केल्या. अजिंक्यने 167.50 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.