राज्यातील शाळांसाठी उन्हाळी सुट्टी जाहीर, 2 मे पासून ते 14 जून पर्यंत शाळा राहणार बंद 
वेदांत नेब March 30, 2026 12:13 AM

Summer vacation : राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठीची उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांना 2 मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 14 जून पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पुढील शैक्षणिक वर्ष 2026- 27 मध्य विदर्भ व इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरु होणार आहे. 

15 जून ते 29 जून पर्यंत सकाळच्या सत्रात शाळा भरवण्यात येणार

जून महिन्यात विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्य मंडळाच्या शाळा 15 जून ते 29 जून पर्यंत सकाळच्या सत्रात सकाळी सात ते 11:45 यावेळेस सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर 30 जून पासून विदर्भातील शाळा सुद्धा नियमित सुरु होतील. राज्यातील इतर मंडळांच्या शाळांचे वेळापत्रक पाहता व त्या शाळांमधील विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याने सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा असं परिपत्रकात शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत या सूचना जिल्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय अशासकीय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांना देण्यात आल्या आहेत. माध्यमिक शाळा संहिता नियम 52(2) नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. शैक्षणिक वर्षातील किमान 220 दिवस अध्यपन होणे गरजेचे आहे. त्यानुसार सुट्ट्यांचे नियोजन करण्यात येते.

Child Health : पालकांनो.. सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवायचंय? तर फक्त हे काम करा, जाणून घ्या

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.