Why Mumbai Indians behind RCB despite big chase explanation? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्या दोन सामन्यांत जूनं ते सोनं हे सिद्ध झालं. उद्घाटनीय लढतीत विराट कोहलीने मॅच विनिंग खेळी केली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, लढतीत रोहित शर्मा ( Rohit Sharma) व अजिंक्य रहाणे, हे सीनियर खेळाडू चमकले. मुंबईने २२१ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि हा त्यांचा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला. तरीहीIPL 2026 Point Table मध्ये MI दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
अजिंक्य रहाणे ( ६७), अंगकृश रघुवंशी ( ५१), फिन अॅलन ( ३७) व रिंकू सिंग ( नाबाद ३३) यांच्या खेळीने कोलकाताला ४ बाद २२० धावांपर्यंत पोहोचवले. MI च्या शार्दूल ठाकूरने ३ विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या रोहित शर्मा व रायन रिकेल्टन या ओपनिंग जोडीने १४८ धावांची विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी ११.५ षटकांत या धावा केल्या. रोहित ३८ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ७८ धावांवर बाद झाला.
MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळीरिकेल्टनही ४३ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह ८१ धावांवर रन आऊट झाला. या दोघांनी मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. तिलक वर्मा ( २०), सूर्यकुमार यादव ( १६) व हार्दिक पांड्या ( नाबाद १८) यांनी औपचारिकता पूर्ण केली. मुंबईने १९.१ षटकांत ४ बाद २२४ धावा करून विजय मिळवला. आजच्या सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून ४४४ धावा झाल्या, ज्या सर्वोत्तम ठरल्या. पण, या विजयानंतर MI गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर काल SRH वर २०३ धावांचा यशस्वी पाठलाग करणारा RCB अव्वल स्थानी कायम राहिले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ च्या उद्धाटनीय सामन्यात हैदराबादच्या २०२ धावांच्या लक्ष्याचा १५.४ षटकांत ६ विकेट्स राखून सहज पराभव केला. मुंबई इंडियन्सने आज २२० धावांचे लक्ष्य पार केले आणि त्यासाठी ते १९.१ षटकापर्यंत खेळले. RCB ने २६ चेंडू व ६ विकेट्स राखून SRH वर विजय मिळवला होता. त्यामुळे RCB चा नेट रन रेट हा २.९०७ इतका चांगला राहिला. मुंबईने आज १४ षटकांत मॅच जिंकली असती तर ते अव्वल स्थानावर पोहोचले असते. मुंबईचा नेट रन रेट आता ०.६८७ इतका आहे आणि त्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले.