Indian Eating Habits : भारतीय संस्कृतीत हाताने जेवण्याची पद्धत का?
Marathi March 30, 2026 06:25 PM
Thayir Idli Recipe: नाश्त्यासाठी बनवा साऊथ स्टाईल दही इडली

काळ बदलत असल्याने त्यानुसार अनेक नवनवीन गोष्टी, सवयी आत्मसात केल्या जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे जेवणासाठी चमचा, काटा किंवा सुरीचा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा एखाद्या मोठ्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर खूपजण एथिक्स पाळण्यासाठी ही गोष्ट फॉलो करतात. पण, घरी मात्र जोपर्यंत हाताने जेवत नाही तोपर्यंत तृप्तीचा ढेकर येत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून हाताने जेवणाची परंपरा आहे. पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा वैज्ज्ञानिक दृष्टीकोनातूनही फायदेशीर आहे. आज आपण हाताने जेवण करण्याामागे भारतीयांचा दृष्टीकोन काय आहे? यामागे भारतीय संस्कृतीत काय कारणे सांगण्यात आली आहेत? हे पाहणार आहोत.

पंचतत्वांचा सन्मान –

भारतीय संस्कृतीत मानवी शरीर हे पाच तत्वांनी बनल्याचे सांगण्यात आले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती हाताच्या पाचही बोटांचा वापर करून जेवते तेव्हा या पंचतत्वांचा सन्मान होतो असे म्हणतात.

अनुभव –

हाताने अन्न खाल्ल्याने त्याला स्पर्श होतो. ज्यामुळे भावनिक आणि आध्यात्मिक संबंध निर्माण होतो. या सर्वांमध्ये अन्नग्रहण करणे ही केवळ एक गोष्ट राहत नाही तर एक अनुभव बनतो.

हेही वाचा – Health Care: हवं तेव्हा गोड खाता? आयुर्वेदानुसार जाणून घ्या योग्य वेळ

निरोगी पचनक्रिया –

हाताने अन्नपदार्थांना स्पर्श केल्यानंतर त्या संवेदना मेंदूपर्यंत थेट पोहचतात. ज्यामुळे चावण्याची क्रिया व्यवस्थित पार पडते. ज्यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहते.

लक्षपूर्वक खाणे –

हाताने जेव्हा एखादा पदार्थ खाल्ला जातो तेव्हा माइंडफुल इटिंग होतं. माइंडफुल इटिंग म्हणजे अन्नाचा प्रत्येक घास पूर्ण जागरूकतेने, चवीने आणि शांतपणे खाणे. हाताने जेवल्याने अन्नावर लक्ष क्रेंदित होते आणि खाण्याचा आनंद मिळतो. परिणामी पचन सुधारते, अतिखाणे टाळले जाते.

एकदरंच, काटे-चमच्याऐवजी हाताने खाणे ही अधिक सोपी आणि शरीराशी जोडणारी सुसंगत पद्धत मानली जाते. त्यामुळे हाताने जेवणे ही एक कृती नाही तर भारतीय संस्कृतीशी असलेली जोड आहे जी आपण सर्वांनी पाळायला हवी.

हेही वाचा – Nonveg Food : उन्हाळ्यात चिकन की मटण पचण्यास हलकं?https://marathi.tezzbuzz.com/lifestyle/chicken-or-mutton-whi-is-lighter-on-the-stomach-in-summer/973610/

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.