राजगुरुनगर : राजगुरुनगर-पाबळ रस्त्यावरील चव्हाणमळा परिसरातील टाकळकरवाडी फाट्याजवळ रिक्षा व मोटारसायकल यांच्या धडकेत तरुण पोलिस मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवारी (ता. २८) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकांत श्रीधर होले (वय ३७, रा. होलेवाडी, ता. खेड) असे मृत पोलिसाचे नाव आहे.
Pune Passport News: मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला; नवीन ठिकाणाहून ३० मार्चपासून सेवा, पुणे व परिसरातील नागरिकांना दिलासा!पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिस शशिकांत होले मोटारसायकलवरून (एमएच १४ जीजी ७१७१) होलेवाडी येथे आपल्या घरी निघाले होते. ते पाबळ रस्त्यावरील चव्हाणमळा परिसरातील टाकळकरवाडी फाट्याजवळ होते. तेव्हा पाबळ बाजूने आलेल्या भरधाव रिक्षाने (एमएच १२ एफ ६८४७ ) वळण्याचा इशारा न देता अचानक यू-टर्न घेतला आणि ती होले यांच्या मोटारसायकलला पुढील बाजूस धडकली.
या अपघातात होले रस्त्यावर आपटले आणि त्यांचे हेल्मेट रस्त्याच्या बाजूला पडून डोक्याला व चेहऱ्याला जबर मार लागला. रिक्षाचालक मात्र तेथून निघून गेला. त्याचवेळी त्यांचे चुलतभाऊ विजय होले मोटारसायकलवरून मागून येत होते. त्यांनी लोकांच्या मदतीने शशिकांत होले यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!शशिकांत होले हे पिंपरी-चिंचवडच्या म्हाळुंगे पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे. पोलिस श्रीकांत होले हे त्यांचे थोरले भाऊ व होलेवाडीच्या सरपंच सोनम होले या त्यांच्या वहिनी होत. या घटनेनंतर होलेवाडी परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.