हा पक्षी म्हणजे सापांसाठी कर्दनकाळच, पाळला तर पुन्हा घरात कधीच साप दिसणार नाही, दूरूनच निघून जातात
Tv9 Marathi March 30, 2026 09:45 PM

सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमज असतात. या गैरसमजांमुळेच आपण अनेकदा घरात निघालेल्या सापांना मारून टाकतो. त्यामुळे आज सापांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, तर काही जाती या दुर्मिळ झाल्या आहेत. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. सापांच्या अनेक प्रजाती अशा असतात ज्यांचं मुख्य अन्न हे उंदिर असतं, सापांमुळे उंदरांची संख्या कमी होते आणि शेतकऱ्यांच्या पिकांचं संरक्षण होतं. त्यामुळे तुम्हाला कुठेही साप दिसला तरी त्याला न मारता त्याची माहिती ही तुमच्या परिसरातील सर्वमित्रांना द्यावी, ते सापांना रेस्क्यू करून सुरक्षित अधिवासात सोडतील.  मात्र साप घरात येऊ नये म्हणून देखील काही खबरदारी घेणं गरजेचं असतं.

आपण जिथे राहतो तो परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा, सापांना लपण्यासाठी जागा मिळेल अशी अडचण तिथे असू नये, याशिवाय अशा काही विशिष्ट वनस्पती देखील असतात ज्यांच्या गुणधर्मामुळे साप घरात प्रवेश करत नाहीत, या वनस्पती देखील तुम्ही तुमच्या घराच्या आसपास लावू शकतात. तसेच काही पक्षी हे सापाचे नसर्गिक शत्रू असतात, जर हे पक्षी आसपास असतील तर साप घरात प्रवेश करत नाहीत. सापांना या पक्ष्यांपासून धोका जाणवतो. आज आपण अशाच एका पक्ष्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ग्रामीण भागात जवळपास सर्वच घरांमध्ये हा पक्षी दिसून येतो.

भारतामध्ये सापांच्या ज्या प्रजाती आहेत, त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच प्रजाती या विषारी आहेत, ज्यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार, आणि नाग या चार प्रमुख सापांच्या प्रजातींचा समावेश होतो. मात्र या चारही प्रजाती महाराष्ट्रात आढळून येतात. जर तुम्ही घरी कुकटपालन करत असाल तर तुमच्या घराच्या आसपास सुद्धा कधी साप दिसणार नाही. कारण ज्या प्रकारे मोर हा सापाचा नैसर्गिक शत्रू आहे, त्याच्यप्रमाणे कोंबडी देखील सापाची नैसर्गिक शत्रू आहे. त्यामुळे जिथे कोंबडी असते तिथे सापाला धोका जाणवतो आणि तो तेवढ्या परिसरामध्ये देखील कधी येत नाही. जर साप कोंबडीच्या तावडीमध्ये सापला तर कोंबडी सापाला मारून टाकते. कोंबडीची नजर ही खूपच तिक्ष्ण असते, सापसोबतच विचंवासारख्या किटकांपासून देखील त्यामुळे तुमचं संरक्षण होतं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.