आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील पहिला सामना आहे. उभयसंघातील हा सामना राजस्थानच्या होम ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सामना गुवाहाटातील बारसपारा क्रिकेट स्टेडियमध्ये होणार आहे. सामन्यातील पहिला बॉल संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी टाकण्यात येणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन रियान पराग याने फिल्डिंगचा निर्णय घेत चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, मॅथ्यू शॉर्ट, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, मॅट हेन्री, अंशुल कंबोज आणि खलील अहमद.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई आणि ब्रिजेश शर्मा.