Mangalwedha Basaveshwar Memorial movement: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून लढा उभारण्याचे आवाहन
esakal March 30, 2026 11:45 PM

मंगळवेढा : राज्यात शक्तीपीठ महामार्गाची मागणी नसताना शासनाने 80 हजार कोटीची तरतूद केली मात्र गेली अनेक वर्ष राजकीय व्यासपीठावर तरंगत असलेल्या बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न सरकारने मार्गी लावला नाही. सरकार कुणाचेही असो स्मारकासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून सरकारच्या छताडावर बसायची तयारी ठेवा अशा आवाहन अॅड राहुल घुले यांनी केले.

मंगळवेढ्यातील प्रलंबित बसवेश्वर स्मारकासाठी जनजागृतीसाठी बसवप्रेमी नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये ते बोलत होते यावेळी रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहूल शहा, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे, नगरसेवक अजित जगताप, प्रवीण खवतोडे, सोमनाथ अवताडे, सोमनाथ माळी, अनिल बोदाडे,प्रतिक किल्लेदार, संतोष मोगले, विजय बुरकुल, नागेश डोंगरे;चंद्रशेखर कोंडुभरी,नारायण गोवे प्राध्यापक विनायक कलबर्,मे सतीश दत्तू,लहू ढगे, दत्तात्रय कोरे, दत्तात्रय तोडकरी, शिवानंद पाटील, यांच्यासह बसव प्रमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतेयावेळी बोलताना अॅड घुले म्हणाले की लोकशाहीचा संदेश देणाऱ्या महात्मा बसवेश्वराचा पुतळा इंग्लंड सरकार उभा करू शकते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून दिली या दोन महात्म्याचे विचार त्यामुळे आज जगाला माहीत झाले त्यामुळे एका बाजूला जनजागृती दुसऱ्या बाजूला सरकार स्मारकासाठी सरकार कोणाचेही असू द्या त्याच्यासाठी लढू या असे आवाहन केले. अध्यक्ष राहुल शहा म्हणाले की सध्या शहरातील प्रमुख कार्यालये बाहेर गेल्यामुळे बाजारपेठ ओस पडली.

त्याला ऊर्जेचा अवस्था मिळणे आवश्यक आहे स्मारकाच्या रूपाने उर्जेचा अवस्था मिळेल शहरातील बेरोजगारांना काम देखील मिळेल. नगरसेवक अजित जगताप म्हणाले की राज्यातील काही धार्मिक स्थळाचा विकास करण्याचे केंद्र शासनाने ठरवले आहे त्यासाठी स्मारकासाठी केंद्र सरकारचा निधी उपलब्ध करण्यासाठी राज्याबरोबर केंद्राकडे शिष्टमंडळ पाठण्यासाठी प्रयत्न करूया स्थानिक आमदार पालकमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून एकत्र येऊन प्रयत्न करून स्मारकाचा प्रश्न मार्गी लावूया.नागेश डोंगरे म्हणाले की लोकचळवळीतून स्मारका हेतू साध्य होणार आहे त्यासाठी लोकांची भावना तयार झाली तर स्मारक उभारू शकते. नगरसेवक गौरीशंकर बुरुकुल म्हणाले की तत्कालीन कृषिमंत्री पांडुरंग फुडकर यांच्या काळात जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी पाठपुरावा केला परंतु त्यांच्या अकाली जाण्याने स्मारकाचे काम रखडले आहे त्यामुळे या कामासाठी आमदार कुठल्या पक्षाचे आहेत हे न पाहता स्मारक होण्यासाठी सर्वांनी मंगळवेढे करून म्हणून त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करूया. विजय बूरकुल म्हणाले की मुर्ती बसवून भव्यता होणार नाही 2010 स्व.आ.भारत भालके यांच्या प्रयत्नाने कागदावर बैठक झाली. बसवेश्वरांची भव्यता कायम ठेवून स्मारक उभारण्याची गरज आहे यावेळी प्रा. विनायक कलुबर्मे, सतीश दत्तू,संतोष मोगले, दत्तात्रय तोडकरी,दत्तात्रय माळी, बापू मेटकरी, शिवानंद पाटील यांची भाषणे झाली.

महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी दि. 5 ते 12 एप्रिल या कालावधीत विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहे. दि 5 एप्रिल रोजी जन्मभुमी बागेवाडी ते कर्मभूमी मंगळवेढा बसवज्योत सायकल यात्रेतून शुभारंभ होणार असून दि 6 एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर मूर्ती पूजन

दि 7 एप्रिल रोजी प्रबोधन मशाल रॅली,

दि 8 एप्रिल रोजी सह्यांची मोहीम,

दि 9 एप्रिल रोजी महिलांची प्रबोधन पदयात्रा,दि 10 एप्रिल निबंध स्पर्धा,

दि 11 एप्रिल मोटरसायकल रॅली,

दि 12 एप्रिल रोजी भव्य महात्मा बसवेश्वर स्मारक संकल्प मेळावा होणार आहे तसेच शहरात व तालुक्यात स्मारक जनजागृतीचे डिजिटल बोर्ड,मोटारसायकल स्टिकर,पत्रके वाटणे अशी तयारी करण्यात आली. सदर स्मारक मंगळवेढ्यात होणे का आवश्यक आहे,त्यातून शहराचा कसा विकास होणार आहे व पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होणार आहेत याची माहिती शहर व तालुक्यातील सामन्यातील सामान्य लोकांना पटवून देण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी प्रबोधनात्मक सप्ताहाचे नियोजन करण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.