Pune Crime News : महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित बाबा ऋषिकेश वैद्य (Rishikesh Vaidya) सध्या 9 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. स्वयंघोषित बाबा ऋषिकेश वैद्य प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. ऋषिकेश वैद्यला पोलिस कोठडीत पूजा करायची आहे. त्यासाठी त्याने साहित्य आणि पुस्तकांची कोर्टाकडे अजब मागणी केली आहे. पोलिस कोठडीत पूजा अर्चा करता यावी म्हणून न्यायालयाला विनंती केली आहे. न्यायालयाने आरोपीची मागणी फेटाळली आहे.
पोलिस कोठडीत धार्मिक पूजा, अर्चा करणारे लागणारे साहित्य व पुस्तकं मिळावी अशी मागणी ऋषिकेश वैद्यने केली आहे. स्वयंघोषित धर्मगुरु ऋषिकेश वैद्य याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत. वैद्यला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित धर्मगुरूविरोधात एका महिलेने वसई येथील माणिकपूर पोलिस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पीडित महिला 35वर्षांची असून ती पुण्यात राहते. हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुणे पोलिसांनी ऋषिकेश वैद्यला पिंपरी येथून अटक केली. हे प्रकरण 2023 मधील आहे. पुण्यात राहणारी पीडित महिलेची वसईमध्ये राहणाऱ्या ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित धर्मगुरूशी ओळख झाली. ऋषिकेश वैद्यने या महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तो तिला भेटण्यासाठी डिसेंबर 2023ला पुण्यात आला होता. यावेळी मांजरी येथील एका लॉजवर त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्याने तिला गुंगीचे औषध देत हे भयंकर कृत्य केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
पीडित महिला पुण्यात राहते. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, 2023 मध्ये तिची ओळख वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू आणि ‘आमची वसई’ या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली. त्याने या महिलेला अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने जवळीक साधली होती.
सध्या राज्यात स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरातचं लैंगिक शोषणाचं प्रकरण प्रचंड चर्चेत आहे. या अशोक खरात प्रकरणानंतर पीडित महिलेनं हिंमत दाखवत सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर कुटुंबाच्या मदतीने या महिलेने 25 मार्च 2026 रोजी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून कलम 64, 351(2) नुसार आरोपी ऋषिकेश वैद्य यांच्यावर 'झिरो एफआयआर' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने सुरुवातीला वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, घटनेचे मुख्य ठिकाण पुण्यातील मांजरी (हडपसर) असल्याने हा शून्य क्रमांकाने दाखल केलेला गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.