Premature Ageing : या 8 सवयी तुम्हाला वेळे आधीच वाधर्क्य आणतात, आठवी सवय तर सर्वात घातक
GH News March 31, 2026 01:10 AM

Everyday Habits That Make You Age Faster: आजकाल आरोग्याविषयी अनेक लोक जागरुक होत आहेत. लोक मद्यपान सोडत आहेत, जंकफूडपासून दूर रहात आहेत आणि फिट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एका सत्याकडे आपण लक्ष देत नाहीत. आपला दैनंदिन सवयींमुळे आपण हळूहळू म्हातारे होत चाललो आहोत. वयवाढ केवळ चेहऱ्याच्या सुरकुत्या आणि पांढऱ्या केसांपर्यंत नाही तर शरीराच्या आतील पेशींवरही परिणाम करते. चला या सवयी कोणत्या ते पाहूयात…

दीर्घकाळ एका जागी बसून काम करणे

सर्वात वाईट सवय म्हणजे एका जागी जास्त वेळ बसणे, १३ अभ्यासांवर आधारित युएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका मेटा – एनालिसिसनुसार जे लोक ८ तासाहून जास्त वेळ एका जागी बसतात आणि व्यायाम करत नाहीत. त्यांच्यात मृत्यूचा धोका लठ्ठपणा वा धुम्रपानाजेवढा होऊ शकतो. रोज ६० – ७५ मिनिटांच्या फिजिकल एक्टीव्हीटी या धोक्याला कमी करु शकते. दीर्घकाळ एका जागी बसल्याने मेटाबॉलिझम धीमा होतो. आणि शरीराच्या डीएनएचे टेलोमीयर वेगाने छोटे होते, जे एजिंगला वाढवतो.

झोपेची कमतरता

दुसरे मोठे कारण झोपेची कमतरता आहे. जर तुम्ही विचार करत असाल की ५ तासांची झोप पुरेशी आहे. तर हा शरीरासोबत अन्याय आहे. नॅशनल हार्ट लंग्स एण्ड ब्लड इन्स्टिट्यूटच्या अनुसार वयाच्या हिशेबाने झोपेची गरज वेगवेगळ असते. याकडे दुर्लक्ष केल्यास दीर्घकाळाने आरोग्य समस्या वाढतात. झोपेमध्ये शरीर स्वत:ला रिपेअर करतात. हार्मोन्स बँलन्स करते आणि एनर्जीला रिस्टोर करते. सतत झोप अपुरी झाल्याने त्वचा, इम्युनिटी आणि विस्मृतीवर परिणाम होतो.

तणावाची सवय

तिसरी सवय सतत तणावात राहणे, जेव्हा दीर्घकाळ तणावात राहिल्याने शरीरात कोर्टिसोल वाढते.,जे त्वचेला नुकसान पोहचवते आणि सुरकुत्यांना आमंत्रण करते.याशिवाय हृदय, पचन आणि मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करते.

स्क्रीन टाईम आणि कम पाणी पिण्याची समस्या

चौथी समस्या आवश्यकतेपेक्षा जास्त स्क्रीन टाईम. मोबाईल आणि लॅपटॉपचा जास्त वापर झोपेचे चक्र बिघडवते. ब्ल्यु लाईटमुळे स्कीनवर देखील परिणाम होतो. रात्री उशीरापर्यंत स्क्रीन पाहिल्याने एजिंग वेगाने होते. पाचवी सवय पाणी कमी पिणे. डिहायड्रेशनने त्वचा निर्जीव दिसते आणि शरीरातील अनेक फंक्शन धीमे पडते. पाणी शरीराला डिटॉक्स करणे आणि योग्य प्रकारे काम करण्यास मदत करते.

या सवयी देखील घातक

सहावी सवय जास्त साखर आणि प्रोसेस्ड फूड सेवन करणे हे आहे. जास्त साखरेने शरीरात ग्लायकेशनची प्रक्रिया वाढते. ज्यामुळे त्वचेचे इलास्टिसिटी कमी होते आणि सुरकुत्या लवकर येतात. सातवी सवय स्ट्रेंथ ट्रेनिंगला दुर्लक्ष करणे. वयासोबत स्नायू कमी होत जातात आणि जर एक्सरसाईज न केले तर ही प्रक्रिया तेज होते. ज्यामुळे शरीर कमजोर आणि सुस्त होते. आठवी आणि महत्वाची सवय सोशल कनेक्शनकडे दुर्लक्ष करणे. संशोधनात आढळले की एकटेपणा आणि सामाजिक अंतराने वेळे आधीच मृत्यूचा धोका वाढू शकतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.