Kitkat Chocolate : तब्बल 12 टन किटकॅट चॉकलेट गायब, चोरीसाठी असं डोकं लावलं की…घटनेनं सगळ्यांचं डोकं चक्रावलं!
Tv9 Marathi March 30, 2026 10:45 PM

Kitkat Chocolate Theft : चॉकलेट प्रत्येकालाच आवडतं. अनेकजण वेगवेगळ्याा प्रकारचे चॉकलेट आवडीने खातात. बाजारात काही चॉकलेटची किंमत तर हजारो रुपये असते. तरीही लोक आवडीने असे चॉकलेट खातात. नेस्ले ही चॉकलेट निर्मिती उद्योगात एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीकडून किटकॅट या चॉकलेटची निर्मिती केली जाते. आता याच चॉकलेटबाबत एक महत्त्वाची आणि चकित करणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोरांनी तब्बल 12 टन किटकॅट चॉकलेच चक्क चोरीला गेले आहेत. किटकॅटची निर्मिती करणारे प्रशासन आता चोरीला गेलेल्या चॉकलेटचा शोध घेत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 12 टन किटकॅट चॉकलेट चोरीला गेल्या आहेत. युरोपमध्ये ही घटना घडली आहे. नेस्ले कंपनीनेच याबाबत सोशल मीडियाच्या माध्यामातून माहिती दिलेलीआहे. मध्य इटलीमध्ये नेस्ले कंपनीचा कारखाना आहे. या कारखान्यात किटकॅट हे चॉकलेट तयार केलं जातं. तयार करण्यात आलेल्या या 12 टन चॉकलेटची एक खेप पोलंडमध्ये पाठवण्यात येत होती. याच मार्गावर या 12 टन किटकॅट चॉकलेटची चोरी करण्यात आली.

ईस्टरच्या काळातच झाली चॉकलेटची चोरी

आता किटकॅटची पालक कंपनी नेस्ले आता स्थानिक पोलीस, प्रशासनाच्या मदतीने चोरीला गेलेल्या चॉकलेटचा शोध घेत आहे. तसेच नेस्लेने सांगितल्यानुसार ग्राहकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केलेली नाही. त्यांची सुरक्षितता अबाधित आहे, असेही या कंपनीने स्पष्ट केले आहे. नेस्ले कंपनीच्या प्रवक्त्यांनीही या चोरीची पुष्टी केली आहे. अशा प्रकारच्या घटना या घडत असतात. ही चोरी ईस्टरच्या काही दिवस अगोदरच घडली आहे. या काळात अनेक लोक चॉकलेट हंटचा आनंद लुटतात. अशा स्थितीतीच ही चोरी करण्यात आली, असे नेस्लेच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

12 टन किटकॅट चॉकलेट कुठे गेले?

दरम्यान ही चोरी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. इंटरनेटवर अनेक मीम्स शेअर केले जात आहेत. तर दुसरीकडे तब्बल 12 टन चॉकलेट नेमके कुठे गेले, याचाही शोध घेण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.