Iran War Impact: इराण, अमेरिका आणि इस्रायल दरम्यान चालू असलेल्या संघर्षाचा फटका आता अनेक देशांना बसू लागला आहे. तेल आणि गॅसच्या पुरवठ्यात बाधा निर्माण झाल्याने अनेक आशियाई देशात इंधन संकट निर्माण झाले आहे. अनेक देशात तर कोरोना काळातील लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण झाली आहे. सरकारने इंधन वाचवण्यासाठी आणि स्थिरता आणण्यासाठी असाधारण पाऊले उचलली जात आहेत. आता फिलीपाईन्स सारख्या देशाने राष्ट्रीय ऊर्जा इमर्जन्सी जाहीर केली आहे.
इराण युद्धामुळे अनेक आशियाई देशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. आपला शेजारील पाकिस्तानात तर स्मार्ट लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यातच आता फिलीपाईन्समध्ये राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे.फिलीपाईन्सचे आतापर्यंतचे हे सर्वात कठोर पाऊल म्हटले जात आहे. राष्ट्राध्यक्ष फर्डिनेंड मार्कोस ज्युनिअर यांनी ही राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी घोषीत करताना इंधन संकटाचा इशारा जनतेला दिला आहे. बातमीनुसार फिलीपाईन्समध्ये इंधनाचा साठा केवळ ४० ते ४५ दिवसांचा उरला आहे. यामुळे सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. कामकाजाचे तास कमी करणे, प्रवासावर मर्यादा आणणे आदी उपाय लागू केले आहेत. तसेच अन्न, इंधन आणि औषधे असा अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठ्याला प्राथमिकता दिली जात आहे.
पाकिस्तानात परिस्थिती बिगडत चालली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ इंधनाची बचत करण्यासाठी वीकेंण्डला स्मार्ट लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहेत. वर्क फ्रॉम होमचे धोरण, शाळांना बंद करणे आणि प्रवासावर बंदी घालण्यासारख्या बाबी या स्मार्ट लॉकडाऊन अंतर्गत येत आहेत.
दक्षिण कोरियाने एक जन मोहिम सुरु केली आहे. यात नागरिकांना ऊर्जेचा खप कमी करण्यासाठी आग्रह केला जात आहे. सरकारने कठोर दिशा – निर्देशांना जारी करत वीजेचा वापर कमी करणे, रात्रीचा उपकरणांना चार्ज करण्याचा वेळ कमी करणे, आणि कमी अंतरासाठी सायकल आणि सार्वजनिक परिवहनाचा वापर करण्याचा आग्रह करणे यांचा समावेश आहे.
व्हिएतनामच्या हवाई वाहतूक क्षेत्रावर संकटाचे ढग जमा झाले आहे. व्हिएतनाम एअरलाईन्सने घरगुती मार्गांवर उड्डाणे निलंबित करण्याची घोषणा केली आहे. जेट इंधनच्या वाढत्या किंमती आणि पुरवठ्यातील कमतरतेमुळे व्हिएतनाम दर आठवड्याला अनेक उड्डाणे रद्द करत आहे.
थायलंडमध्ये सरकारने ऊर्जेची बचत करण्यासाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. कार्यालयात आता वर्क फ्रॉर्म होमचे आदेश दिले आहेत. इतकाच काय वातानुकूलित यंत्रणांना नियंत्रित केले जात आहे.इंधनाचा खप कमी करण्यासाठी सरकारने परदेशी प्रवासावर बंदी आणली आहे.
श्रीलंकेने चार दिवसांचा आठवडा लागू केला आहे. इंधनाचा खप कमी व्हावा यासाठी बुधवारी सुट्टी जाहीर केली आहे. या मार्गाने इंधनाची खपात २५ टक्क्यांपर्यंत कमी येऊ शकते. या संकटाच्या काळात काहीतरी दिलासा मिळावा यासाठी आठवड्यात चार दिवसच काम होणार आहे.
भारताने तात्काळ लॉकडाऊन सारखी काही पावले उचलली नसली तरी या युद्धाचा परिणाम भारतात साफ दिसत आहे. पेट्रोलपंपावर लागलेल्या लांब रांगा आणि कोसळता रुपया या दबावाचे संकेत आहेत. मात्र, भारताकडे ६० दिवसांचा इंधनाचा साठा असल्याने निकटच्या काळात लॉकडाऊन सारख्या स्थितीची शक्यता कमी आहे.