कामगार संघाची नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर; रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घोषणा
एबीपी माझा ब्युरो March 30, 2026 11:13 PM

मुंबई : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे  अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकारिणीची घोषणा

नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीमध्ये संयुक्त सरचिटणीस म्हणून रुपेश धुमाळे, उपाध्यक्ष म्हणून किरण पवार, युहान केर्सी दोराबाजी आणि सुजित न्यायनिर्गुणे यांची नियुक्ती करण्यात आली. तसंच सचिवपदी प्रभुदास भोईर, मुखांश नाईक आणि गजानन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संघाचे सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस योगेश आवळे, साई घोगळे, शरद येटम, जितेंद्र राऊत आणि निशांत गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

माथाडी संघटनेचीही घोषणा

याच कार्यक्रमात अखिल भारतीय माथाडी संघटनेची कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. रायगड जिल्हाध्यक्षपदी जितेश शिंदे, भिवंडी-पालघर उपाध्यक्षपदी सचिन जोशी, ठाणे-उरण उपाध्यक्षपदी विक्रांत भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. तसंच दक्षिण मुंबई उपाध्यक्षपदी राहुल लहासे, वरळी विधानसभा अध्यक्षपदी शैलेश तोडकरी आणि सरचिटणीसपदी समीर शेख यांची निवड झाली आहे.

प्रत्येक घटकाला न्याय देण्यावर भर

यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यावर भर दिला जात आहे. यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रशासन समन्वयातून सर्वांनी  मिळून काम करायचे आहे. कोणावरही अन्याय होणार नाही आणि शासन-प्रशासनाच्या समन्वयातून सर्वांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.