जर तुम्हाला वाटत असेल की हे ब्रश फक्त डिझाइनसाठी आहेत किंवा त्यांचा वापर तुमचे बूट स्वच्छ करण्यासाठी होऊ शकतो, तर तसं बिलकूल नाहीये. एस्केलेटरच्या बाजूला असलेले ब्रश तुमचे बूट चमकावण्यासाठी नसतात. तर त्याचा एक खास उपयोग असतो, तोही तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी.
खरंतर Escalators वर लावलेले हे ब्रश म्हणजे आपल्याच सेफ्टीसाठी आहेत. हे ब्रश साईड आणि भिंतीमधील अंतर किंवा गॅप लपवण्याचं काम करतात. लोकांच्या बुटाच्या लेस किंवा ओढणी, अशा छोट्या गोष्टी या गॅपमध्ये अडकू नयेत, म्हणून हे ब्रश एस्केलेटरवर लावलेले असतात.
दोन्ही बाजूला असलेले हे ब्रश कपडे आणि वस्तूंना एस्केलेटरमध्ये अडकवण्यापासून वाचवण्याचं काम करतात. जर या गोष्टी एस्केलेटरमध्ये अडकल्या तर त्यामुळे मशीनचे नुकसान होऊ शकते. तसेच तुमचा पायही त्यात खेचला जाऊ सकतो, अपघात होऊ शकतो. म्हणूनच त्यात ब्रश बसवलेले असतात. एस्केलेटरवरील ब्रश हे सेफ्टी फीचर म्हणून काम करतात.
तुमचा पाय पिवळी पट्टी ओलांडून जर पुढे गेला, तर तो ब्रश पायाला घासला जातो, आपण इरिटेट होतो, पण खरंतर तरी तुमचा पाय पिवळ्या पट्टीच्या आत घ्या अशी सूचना असते. तसंच जर कोणी एस्केलेटरच्या अगदी कडेला, पाय टाकला तर हे ब्रश दुखापत टाळण्यास मदत करतात. त्यामुळे अपघातापासून बचाव होतो आणि माणसं सेफ राहतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)