EV Car: चार्जिंग संपली तरी इलेक्ट्रिक कार सुसाट धावणार, ही एक ट्रिक तुम्हाला स्मार्ट बनवणार
GH News March 31, 2026 05:12 PM

Hybrid EV Car: जगभरातील ऑटो कंपन्या कारचे मायलेज वाढवण्यावर आणि प्रदूषण मुक्त वातावरणासाठी अनेक प्रयोग करत आहेत. इराण युद्धामुळे जगावर इंधन संकट कोसळले आहे. इलेक्ट्रिक कार आता सर्वसामान्यांना खुणावत आहे. इलेक्ट्रिक दुचाक्यांचे प्रमाण ही वाढले आहे. पण लांब पल्ल्यांसाठी चार चाकी अजूनही अव्यवहार्य वाटत आहे. आता ग्राहकांसाठी काही खास पर्याय समोर आणले जात आहे. परिणामी ग्राहकांचा मोर्चा ईव्ही कारकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

EV कडे ग्राहकांची का पाठ?

EV खरेदी न करण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बॅटरी संपण्याची भीती हे एक आहे. त्यामुळे अनेक दिग्गज कंपन्या ईव्ही मार्कटमध्ये उतरण्यास धजावत नसल्याचे दिसते. अनेक कंपन्यांनी अद्यापही याविषयीचा प्रयोग करून पाहिलेला नाही. बॅटरी उतरण्याची आणि प्रवास थांबण्याच्या या समस्येवर आता कंपन्या पर्याय शोधत आहे. त्यानुसार , आता Range Extender Electric Vehicles (REEV) विषयी गांभीर्याने चर्चा होत आहे. हायब्रिड कारऐवजी ग्राहकांना स्वयं चार्जिंग होणारी कार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कंपन्या करत आहेत.

काय आहे REEV कार?

Hybrid कार इंजिन आणि बॅटरी या दोन्हीवर चालते. पण रेंज एक्सटेंडर कार ही केवळ बॅटरीवरच धावते. कार एका इंधनावरून दुसऱ्या पर्यायावर स्विच करण्याची गरज उरत नाही. यामध्ये एक पेट्रोल इंजिन असते. पण त्यावर कार धावत नाही. तर हे इंजिन केवळ जनरेटरला ऊर्जा देते. हे जनरेटर वीज तयार करते. त्यामुळे कारची बॅटरी चार्ज होते. म्हणजे कार चालवत असतानाच कार चार्जिंग होते. कार सुरू झाली की पॉवर डाऊन होते. तर दुसरीकडे हे पेट्रोल इंजिन कारची बॅटरी रिचार्ज करते. त्यामुळे लांबच्या टप्प्यात कार चालकाला कार बंद पडण्याची भीती राहत नाही.

एका विशिष्ट वेगाने कार धावली तर हे बॅटरी रिचार्ज होत राहते आणि कार चालकाला बॅटरी चार्जिंगसाठी थांबावे लागत नाही. भारतात सध्या चार्जिंग स्टेशनची कमतरता पाहता अशा कारची अत्यंत गरज आहे. चांगल्या दर्जाची बॅटरी आणि रीव्ह प्रकारची चार्जिंग पद्धत यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढण्याची शक्यता आहे. अर्थात या कारच्या किंमती या सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणे याकडे पण कंपन्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.