अरबाज पटेल निक्की तांबोळीसोबत लग्न करणार? स्पष्टच म्हणाला...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क March 31, 2026 05:13 PM

Arbaz Patel Marriage Plans With Nikki Tamboli: सध्या टेलिव्हिजनवर रिअॅलिटी शोची चलती आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'बिग बॉस', 'स्प्लिट्सविला' (Splitsvilla), 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi), 'रोडीज' (MTV Roadies), 'द 50' (The 50) यांसारख्या अनेक रिअॅलिटी शोच्या नेहमीच चर्चा रंगतात. रिअॅलिटी शोमध्ये (Reality Show) भांडणं, राडे यांसोबतच अनेक जोड्या जुळाल्याचंही पाहायला मिळालंय. या जोड्या शोनंतर तुटतात, तर काही जोड्या आयुष्यभरासाठी बनतात. याची काही उदाहरणंही आहेत, जसं की,'बिग बॉस 15'च्या घरात बनलेली करण कुंद्रा–तेजस्वी प्रकाश यांची जोडी, तर 'बिग बॉस 9'मध्ये जुळलेली प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांची जोडी. असंच एक कपल म्हणजे, बिग बॉस मराठीच्या घरात जुळलेलं आणखी एक कपल सध्या चर्चेत आहे, ते म्हणजे, निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel). 

अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी हे बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेले. त्यावेळी त्यांच्यात मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. शो संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली. सोशल मीडियावर ते अनेकदा एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात, एकमेकांना पाठिंबा देतात. नुकतेच दोघे 'द 50' या रिअॅलिटी शोमध्येदेखील सहभागी झालेले. या शोमध्ये दोघांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली. रिअॅलिटी शोमधून सुरू झालेलं त्यांचं नातं आजही टिकून आहे, हेच त्यांच्या चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरतंय. अशातच आता दोघांना बऱ्याचदा लग्न करणार का? असा प्रश्न विचारला जातो.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

अरबाज आणि निक्की लग्न करणार? 

'द 50' रिअॅलिटी शोचा नुकताच फिनाले पार पडला, शिव ठाकरे या शोचा विनर ठरला. पण, संपूर्ण सीझनमध्ये निक्की आणि अरबाजच्या नात्याची जोरदार चर्चा रंगलेली. आता या शोनंतर अरबाज पटेलनं नुकतीच फिल्मीग्यानला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना अरबाज पटेलनं शोमध्ये झालेले वाद, राडा यासोबतच निक्की आणि त्याच्या नात्याबाबतही मनमोकळ्या गप्पा मारल्या. याचवेळी अरबाजनं निक्कीसोबत लग्न कधी करणार? या प्रश्नाचंही उत्तर दिलंय. नेमकं काय म्हणाला अरबाज पटेल? सविस्त जाणून घेऊयात... 

निक्कीसोबतच्या लग्नाबाबत बोलताना अरबाज पटेल म्हणाला की, "तुम्ही आमच्याबाबत एवढा चांगला विचार करताय, हे ऐकून फार आनंद होतोय... तर लवकरच मुहूर्त काढू, जो चांगला मुहूर्त असेल, त्या मुहूर्तावर लग्न करू, पण सध्याची वेळ काम करण्याची आणि यश मिळवण्याची आहे... हे वय आणि ही वेळ पैसे कमावण्याचं आणि आयुष्यात पुढे जाण्याचं आहे... तर गोष्टी जितक्या चांगल्या होतील, तितक्या लवकर आम्ही धुमधडाक्यात लग्न करू..."

Malaika Arora Visits Jain Temple With Mistry Man: 17 वर्षांनी लहान रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत जैन मंदिरात दिसली मलायका अरोरा; VIDEO पाहून चाहते म्हणाले, 'आता ठरलंय बरं का...'

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.