इराणने अखेर निर्णय घेतलाच… 18 अमेरिकन कंपन्यांचे ऑफिस उडवणार, संपूर्ण जगात खळबळ
GH News April 01, 2026 01:34 AM

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच आता इराणी लष्कराने (IRGC) अरब प्रदेशात असलेल्या अमेरिकेच्या 18 टेक कंपन्यांना थेट धमकी दिली आहे. इराणच्या मते या कंपन्या इराण-अमेरिका संघर्षात सहभागी आहेत. IRGC ने इशारा दिला आहे की, या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयांपासून दूर राहावे. उद्या रात्री 8 वाजल्यापासून हल्ल्यांना सुरुवात होऊ शकते. इराणने ज्या अमेरिकन कंपन्यांना धमकी दिली आहे, त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट, गूगल, अ‍ॅपल, इंटेल, IBM, टेस्ला आणि बोइंग यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराणचा गंभीर इशारा

IRGC ने अमेरिकन कंपन्यांबाबत एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘इराणमध्ये होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात आम्ही काही निवडक कंपन्या आणि त्यांच्या युनिट्सना पूर्णपणे नष्ट करू.’ ही चेतावणी 1 एप्रिल रोजी तेहरानच्या वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता) लागू होईल असे सांगितले आहे. इराणने या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपले प्राण वाचवण्यासाठी तात्काळ कार्यालय किंवा कार्यस्थळ सोडण्याचा सल्ला दिला आहे.

या 18 कंपन्यांना धमकी

  1. डेल
  2. मायक्रोसॉफ्ट
  3. गूगल
  4. अ‍ॅपल
  5. इंटेल
  6. IBM
  7. टेस्ला
  8. बोइंग
  9. ह्यूलेट पॅकार्ड
  10. HP
  11. सिस्को
  12. ओरेकल
  13. मेटा
  14. जेपी मॉर्गन
  15. जनरल इलेक्ट्रिक
  16. G42
  17. एनव्हिडिया
  18. प्लॅन्टर

इराणविरुद्धच्या कारवायांमध्ये मदत केल्याचा आरोप

इराणच्या लष्कराने असा आरोप केला आहे की, या मोठ्या आयटी आणि एआय कंपन्या इराणविरुद्ध चालवल्या जाणाऱ्या मोहिमांमध्ये अमेरिकेला मदत करत आहेत. या कंपन्या केवळ सॉफ्टवेअर तयार करत नाहीत, तर हल्ल्यांची योजना आखण्यात आणि ते अंमलात आणण्यातही सहभागी आहेत. इराणच्या या निवेदनात गूगल आणि मायक्रोसॉफ्टसोबतच एंथ्रोपिक आणि ओपनएआयसारख्या प्रसिद्ध एआय कंपन्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, इराणी लष्कराचा आरोप आहे की, या कंपन्या अमेरिकन आणि इस्रायली सैन्यासोबत काम करत आहेत. कंपन्यांकडून मानवरहित ड्रोन उडवण्यासाठी आणि अचूक लक्ष्य निश्चित करण्यासाठी मदत केली जात आहे. इराणने यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या दिलेल्या आहेत. मात्र यावेळी इराणी सैन्याची निश्चित वेळ देखील सांगितली आहे. त्यामुळे अमेरिकेसह संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.