सायली-प्रियामध्ये जोरदार जुंपली; एकमेकांच्या झिंज्या उपटणार सुभेदारांच्या सुना, कारण ऐकून अर्जुनही हैराण, प्रेक्षक म्हणतात-
esakal April 01, 2026 01:45 AM

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. मालिका टीआरपीमध्ये राहण्यासाठी मालिकांमध्ये निरनिराळे ट्विस्ट टाकण्यात येतात. असाच एक ट्विस्ट आता 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेत येणार आहे. स्टार प्रवाहाची 'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. गेली तीन वर्ष ही मालिका टीआरपीमध्ये १ नंबरवर आहे. मात्र सतत तेच तेच दाखवून मालिका रटाळ झाल्याने आता प्रेक्षक तन्वीचं सत्य समोर आणण्याचा आग्रह करत आहेत. त्यामुळेच मालिकेत आता भलताच ट्विस्ट दाखवण्यात येणार आहे.

या मालिकेचा एक प्रोमो नुकताच समोर आलाय. त्यात सायली आणि प्रियामध्ये जोरदार भांडण होताना दाखवण्यात आलाय. सुभेदारांच्या सुना एकमेकींच्या झिंज्या उपटताना दिसत आहेत. सायली सुभेदाराची अतिशय शांत आणि गुणी सून आहे. मात्र ती चक्क प्रियासोबत भांडण करताना दिसतेय. ती नुसती भांडत नाहीये तर ती प्रियाचे केस पकडून तिला ओढतेय. त्यानंतर जेव्हा अर्जुन तिला विचारतो की तुम्ही असं का केलं तेव्हा ती म्हणते की आपल्याला तिची डीएनए टेस्ट करायला तिचे केस हवे होते आणि आता मला तिचे तीन तीन केस मिळालेत.

View this post on Instagram

A post shared by Krushna Ramprasad Jagtap (Deshmukh) (@official_krushna_jagtap)