नागपूर महापालिकेच्या गलथान कारभारामुळे 234 ई-बसेसला ब्रेक; चार्जिंग स्टेशन अन् डेपो अभावी मंजूर केलेल्या वातानुकूलित बसेस दिल्ली-पुण्यात उभ्या
तुषार कोहळे April 01, 2026 12:43 PM

Nagpur ST E-bus : चार्जिंग स्टेशन अभावी आधीच नागपूर महानगर पालिकेच्या 109 बसेस डेपोमध्ये उभ्या असतांना आता आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. डेपो आणि चार्जिंग स्टेशन अभावी प्रधानमंत्री ई-बस योजने अंतर्गत नागपूर महानगर पालिकेला (Nagpur Municipal Corporations) मिळालेल्या 25 ई-बसेस या दिल्लीमध्ये (Delhi) कंपनीत पार्किंग उभ्या आहे. तर मुख्यमंत्री विशेष निधीतून मिळालेल्या 100 ई-बसेस या पुणे (Pune) येथील कंपनीत पार्किंगमध्ये उभ्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

Nagpur : चार्जिंग स्टेशन अभावी पालिकेने फक्त 50 बसेस मागवून घेतल्या, उर्वरित 25 बसेल दिल्लीला उभ्या

दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी देखील विशेष योजनेतून 250 बसेस मंजूर केल्या होत्या. मात्र पालिकेने डेपो आणि चार्जिंग स्टेशन उभारले नसल्याने पालिकेने फक्त 150 बसेस नागपूरला आणल्या. तर उर्वरित 100 बसेस या पुण्यात उभ्या असल्याची माहिती आहे. प्रधानमंत्री ई- सेवा योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरातील महानगर पालिकांना केंद्र सरकारकडून ई-बस देण्याचा निर्णय झाला. 24 फेब्रुवारीला पंतप्रधानांनी दृरदृश्य प्रणालीमार्फत याचे लोकार्पण देखील केले होते. या योजने अंतर्गत नागपूर महानगर पालिकेला 150 बसेस मंजूर झाल्या. पहिल्या टप्प्यात 75 बसेस देण्यात आल्या. मात्र चार्जिंग स्टेशन अभावी पालिकेने फक्त 50 बसेस मागवून घेतल्या व उर्वरित 25 बसेल दिल्लीला उभ्या आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील 75 बसेससाठी पालिकेने पायाभूत सुविधाच तयार नसल्याने त्याला आणखी वाट पाहावी लागणार आहे.

Nagpur ST Bus : नागपूर शहरात रोज जवळपास एक लाख साठ हजार प्रवाशी बसने प्रवास करतात

नागपूर शहरात रोज जवळपास एक लाख साठ हजार प्रवाशी पालिकेच्या सार्वजनिक बसेसने प्रवास करतात. त्यामुळे वातानुकूलित ई-बसेस शहरात पूर्ण क्षमतेने धावायला लागल्या तर नागपूरकरांच्या प्रवास आणखी सोईस्कर होऊ शकला असता. मात्र नागपूर महानगर पालिकेच्या गलथान कारभारामुळे एकूण 234 बसेल या रेडी-टू-गो स्थिती असतांना नागपूर महानगर पालिका त्याचा उपयोग करू शकत नाही, हि परिस्थिती आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.