अकोला: जिल्ह्यात साेमवारी (ता. ३०) रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालानुसार दिसून येत आहे. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ६५३.३ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली असून यात कांदा, चीया, गहु, लिंबू भाजीपाला पिकांची नासाडी झाली आहे.
पुढील चार दिवस जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाचा अंदाज ३१ मार्च राेजी हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा धास्तावले आहेत.
मोठा निर्णय! आता मुले, तरुण, महिला, ज्येष्ठांना कोणत्याही खासगी रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार; ४५८० रुग्णालये, २३९९ आजारांचा समावेश, वाचा...गतवर्षी जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस जिल्ह्यात झाला हाेता. जिल्ह्यात सरासरी ६९३ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ७३२ मि.मी. पाऊस झाला हाेता. खरीप नंतर रब्बीमध्येही अवकाळी पऊस झाला. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कमी जाणवेल, असा सामन्यांचा अंदाज हाेता. मात्र फेब्रुवारी महिन्यात अखेरच्या आठवठ्यात तापमान ३५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नाेंदवण्यात आले.
फक्त १० मिनिटांत तयार करा प्रोटीन-पनीर-कॉर्न सॅलड – सकाळी ताजेतवाने राहण्यासाठी आतापर्यंतची सर्वात सोपी रेसिपी!मार्चमध्येही प्रचंड तापले. २ मार्च राेजी तर अकाेल्यात भारतात सर्वाधिक ३८.५ सेल्सिअस तापमान नाेंदवण्यात आले हाेते. मात्र गत काही दिवसांपासून अचानक वातावरणात बदल हाेत असून, पारा ४१ पेक्षा कमी झाला. अशातच साेमवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.
असा बसला पिकांना फटकाजिल्ह्यात ३० मार्च राेजी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पिकांच्या नुकसानाची मंगळवारी पाहणी करण्यात आली. प्राथमिक पाहणीनुसार एकूण ६५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.
मूर्तिजापूर तालुक्यातील ८ गावांमध्ये १८. ३ हेक्टर क्षेत्रातील कांदा, चीया, गहु, लिंबू, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अकाेला तालुक्यातील ३६ गावांमध्ये ६३४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली. यात ज्वारी, कांदा, गहू, भाजीपाला उद्धस्त झाला. तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी येथील सखाराम साेमा झिटे यांच्या मालकीच्या ५ मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या. शेतशिवारात वीज पडल्याने मेंढ्या दगावल्या.