Hanuman Jayanti 2026 अकोला : देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह बघायला मिळत आहे. शक्तीची देवता असलेल्या हनुमान, मारुती, बजरंगबली, अंजनीसूत अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या हनुमंताचा (Hanuman Jayanti 2026) आज जन्मदिवस. याच पवित्र दिनाचं औचित्य साधत अकोला (Akola News) जिल्ह्यातील कोथळी बुजरूक गावात हनुमान जयंतीदिनी (Hanuman Jayanti) चक्क माकडांची पंगत बघायला मिळाली आहे. यावेळी माकडांनी एका रांगेत आणि शिस्तीत त्यांच्या आवडत्या मिष्ठानांवर ताव मारताना दिसत आहे.
हनुमंताच्या जयंतीदिनी खास पार्टी रंगलीय ती अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या कोथळी बुजरूक गावात. ही पंगत पाहून आपण काहीसे दचकले असाल अन आश्चर्यचकितही झाले असालच. ही पंगत शक्ती, भक्ती आणि भूतदयेचा अनोखा असा जणू संगमच आहे. हनुमान जयंतीनिमित्त एक अनोखी आणि हृदयाला स्पर्श करणारी परंपरा येथे दरवर्षी पाहायला मिळते. इथे माणसांसाठी नव्हे, तर चक्क माकडांसाठी पंगत बसवली जात आणि विशेष म्हणजे ही माकडंही अगदी शिस्तीत बसून जेवणाचा आस्वाद घेतात.
Hanuman Jayanti 2026 : हनुमान जयंतीनिमित्त माकडांसाठी खास पंगत, वीस वर्षांपासूनची अनोखी परंपरा
कोथळी बुजरूक गावाजवळील घनदाट जंगलात वसलेल्या मुंगसाजी महाराज संस्थानच्या मंदिर परिसरात गेल्या वीस वर्षांपासून ही अनोखी परंपरा सुरूये. रामदास महाराज शिंदे यांच्या पुढाकारातून दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त माकडांसाठी खास पंगत आयोजित केली जाते. या पंगतीत माकडांना आवडणारे चणे, सोयाबीन, गव्हाच्या बिट्ट्या आणि विविध मिष्टान्न पदार्थ वाढले जातात.
Akola News : निसर्गाच्या सानिध्यात आणि घनदाट जंगलात वसलेलं मंदिर भक्तांसाठी विशेष आकर्षण
पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या श्रद्धेने रामनवमी ते हनुमान जयंतीदरम्यान येथे दर्शनासाठी येतात. निसर्गाच्या सानिध्यात आणि घनदाट जंगलात वसलेलं हे मंदिर भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरतय. रामदास महाराज आणि येथील माकडांमधील संवादही विशेष आहे. देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह साजरा होत असताना या अनोख्या परंपरेची सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर असलेली 105 फूट उंच अशी विशाल काय हनुमानाच्या मूर्तीला आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने सूर्योदया वेळी जलाभिषेक करण्यात आला आज दिवसभर नांदुरा येथील तिरुपती बालाजी संस्थान येथील 105 फूट उंच अशा विशाल काय मूर्तीच्या बाजूला विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे सकाळपासूनच भाविकांनी येथे गर्दी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या