घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील हनुमंतवाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (एनडीकेएसपी) शेतकऱ्यांची ‘शेती शाळा’ घेण्यात आली. हा प्रकल्प हवामान अनुकूल तंत्रज्ञान संकल्पनेवर आधारित असून शेतावरच निविष्ठा तयार करून उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देण्यात आला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे व उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना बीआरसी युनिट उभारणीचे फायदे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सीआरटी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत माहिती देण्यात आली. कीड व रोग व्यवस्थापन तज्ज्ञ शिवप्रसाद येळकर यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक विषयांवर मार्गदर्शन केले.
Premium|Studyroom: आर्य समाज, ‘सत्यार्थ प्रकाश’ आणि अंधश्रद्धेविरोधी लढा; दयानंद सरस्वतींच्या जीवनकार्याचा वैचारिक वारसाएप्रिल व मे महिन्यात प्रकाश सापळे व बकेट सापळ्यांचा वापर करून हुमणी अळीचे प्रभावी व्यवस्थापन कसे करावे, बेड मेकरच्या साहाय्याने सरी-वरंबे तयार करून त्यावर मानवचलित टोकण यंत्राद्वारे खरीप पिकांची लागवड कशी करावी, बिजोत्पादन घटक राबवण्याचे फायदे याबाबत त्यांनी माहिती दिली.
Marathwada News:महाराष्ट्राच्या मुलींचा ‘अपसेट’ जलवा; आयटीएफ टेनिस स्पर्धा; मधुरिमा, सोनल यांचा मानांकित खेळाडूंना धक्काप्रशिक्षणादरम्यान शेतावर निविष्ठा निर्मितीचे प्रात्यक्षिक म्हणून ‘जीवामृत’ तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखवण्यात आली. २०० लिटर पाणी, १० किलो गायीचे शेण, १० लिटर गोमूत्र, २ किलो गूळ, २ किलो बेसन आणि मूठभर झाडाखालची माती यांच्या मिश्रणातून तयार होणारे जीवामृत जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याचे येळकर यांनी सांगितले.
प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी केशव सोनपीर यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला संतोष सोनपीर, ओमकेश गीते, दीपक गीते, सूर्यकांत सोनपीर, सूरज सोनपीर, एकनाथ गीते, धनंजय गीते व शेतकरी उपस्थित होते.