फक्त एक डील अन् सारा अली खान झाली रातोरात कोट्याधीश; 5 वर्ष दर महिन्याला खात्यात जमा होणार पैसे
Marathi April 02, 2026 02:25 PM

सारा अली खानने मुंबईतील बंगला भाड्याने दिला आहे. बॉलिवूड (Bollywood News) स्टार्स सिनेमांमधून किंवा ब्रँड एंडोर्समेंटमधून (Brand Endorsement) मोठी कमाई करतात, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण, बरेच स्टार्स असेही आहेत, ज्यांनी रिअल इस्टेटमध्ये स्मार्ट गुंतवणूक (Smart Investment) केली असून यातून ते मोठी कमाई करतात. यात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), मलायका अरोरा (Malaika Arora) यांसारख्या अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. अशातच आता यात एका स्टारकीड असलेल्या अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश झालाय. बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) सारा अली खान (Sara Ali Khan) आता रिअल इस्टेटमधून (Real Estate) मोठी कमाई करताना दिसते. नुकताच तिनं मुंबईतील (Mumbai News) अंधेरी वेस्ट परिसरात असलेला तिचा लक्झरी बंगला भाड्यानं दिलाय. या करारामुळे सारा आता पुढच्या पाच वर्षांमध्ये कोट्यवधींची कमाई करणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननं नुकताच मुंबईतील अंधेरी वेस्ट परिसरातील आपला लक्झरी बंगला मोठ्या रकमेवर भाड्यानं दिलाय. मीडिया रिपोर्टनुसार, ही डील 5 वर्षांसाठी सुमारे 4.14 कोटी रुपयांत करण्यात आलीय. या प्रॉपर्टीचं मासिक भाडं 6.5 लाख रुपयांपासून सुरू होणार असून ते दरवर्षी वाढणार आहे. विशेष म्हणजे, हा बंगला एका शैक्षणिक संस्थेकडून वापरला जाणार आहे, त्यामुळे सारानं केलेली ही डील चर्चेचा विषय ठरलीय.

सारा अली खानची प्रॉपर्टी कुठंय आणि किंमत काय? (सारा अली खान गुंतवणूक करार)

सारा अली खानचा हा बंगला अंधेरी वेस्टमधील ओल्ड लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील बेल्सकोट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे. सुमारे 4,500 चौरस फूट क्षेत्रफळ असलेली ही प्रॉपर्टी Prodigy Montessori India Private Limited या संस्थेला सारानं लीजवर दिलीय. या कराराअंतर्गत भाडेकरूनं 20 लाख रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिटही दिलंय. हा करार 1 मे 2026 पासून लागू होणार असून त्यात 36 महिन्यांचा लॉक-इन पीरियड समाविष्ट आहे.

सारा अली खानची कोट्यवधींची कमाई (Sara Ali Khan Net Worth)

सारानं केलेल्या भाडे करारानुसार, पहिल्या दोन वर्षांत मासिक भाडे 6.5 लाख रुपये असेल. त्यानंतर दरवर्षी भाड्याच्या रकमेत 5 टक्क्यांची वाढ होणार आहे. तिसऱ्या वर्षी भाडं 6.82 लाख, चौथ्या वर्षी 7.16 लाख आणि पाचव्या वर्षी 7.52 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल. अशा प्रकारे, 5 वर्षांत सारा अली खान या प्रॉपर्टीतून एकूण 4 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणार आहेत, जी एक उत्तम गुंतवणूक असल्याचं मानलं जातंय.

बॉलिवूडमध्ये वाढतोय प्रॉपर्टी गुंतवणुकीचा ट्रेंड (Bollywood Celebrity Investments In Real Estate)

बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये प्रॉपर्टी लीज आणि गुंतवणुकीचा ट्रेंड झपाट्यानं वाढतोय. यापूर्वी माधुरी दीक्षित यांनी मुंबईतील लोअर परेल इथला एक ऑफिस स्पेस 4.25 लाख रुपये प्रति महिना भाड्यानं दिलेला. तसेच, राकेश रोशन आणि त्यांच्या पत्नीनं अंधेरी इथे 14.5 लाख रुपये मासिक भाड्यानं प्रॉपर्टी लीजवर दिलीय. बॉबी देओल आणि त्यांची पत्नी तान्या देओल यांनीही अंधेरी वेस्टमध्ये 15 कोटी रुपयांची ऑफिस प्रॉपर्टी खरेदी केलीय. यावरून स्पष्ट होतं की, बॉलिवूड स्टार्स आता रिअल इस्टेटला उत्पन्नाचं मजबूत साधन बनवतायत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Malaika Arora Apartment On Lease: मलायका अरोराची स्मार्ट इन्व्हेस्टमेंट; मुंबईतलं आलिशान अपार्टमेंट दिलं भाड्यानं, कोट्यवधींमध्ये करणार कमाई

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.