Ratnagiri Turtle Festival : गुहागरमध्ये 'कासव महोत्सव' सुरू; १८६ घरटी संरक्षित, पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
esakal April 02, 2026 03:45 PM

गुहागर : निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ कासव महोत्सवाला गुहागरमधील पिंपळादेवी बीच (वरचापाट) येथे आजपासून उत्साहात सुरुवात झाली. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पर्यटकांनी मोठा प्रतिसाद दिला असून, संपूर्ण एप्रिलमध्ये या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील रामेश्वर स्मशानभूमी ते बाग या परिसरात ऑलिव्ह रिडले कासवांचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन केले जाते. यावर्षी गुहागरमध्ये तब्बल १८६ घरटी संरक्षित केली असून, हा आकडा गेल्या दोन वर्षांतील महाराष्ट्रातील सर्वाधिक घरट्यांपैकी एक आहे.

Premium|Study Room : ओडिशाच्या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांची अरिबाडा; जैवविविधतेचा उत्सव आणि पर्यावरणीय सजगतेची कसोटी

या संवर्धन केंद्रांतून दररोज सकाळी कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. महाराष्ट्रातील सर्वांत लांब आणि सुंदर समुद्रकिनारा लाभलेल्या गुहागरमध्ये कासवांचे संवर्धन प्रभावीपणे होत आहे.

निसर्गाचा हा अनोखा आविष्कार पर्यटकांना प्रत्यक्ष पाहता यावा, वनविभागाच्या ‘शेड्युल १’ श्रेणीतील या कासवांच्या जीवनचक्राची माहिती मिळावी आणि स्थानिक पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने कांदळवन कक्ष व गुहागर नगरपंचायतीच्या वतीने हा महोत्सव भरवण्यात आला आहे.

Blue Flag Beaches : गुहागर, लाडघरचा झेंडा जगात फडकणार; ब्ल्यु फ्लॅग दर्जा हा विकासाचा मार्ग; आधी स्वच्छता मग समृद्धी

कासवांचा हा जीवनप्रवास अनुभवण्यासाठी पर्यटकांनी दररोज सकाळी ६:३० वाजता किनाऱ्यावर उपस्थित राहावे, असे आवाहन नगरपंचायत आणि वनविभागामार्फत केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.