The Slowjamastan in the Middle of America: कॅलिफोर्नियाच्या कोचेला व्हॅली आणि मॅक्सिको या देशाच्या सीमेवर एक देश जन्माला आला आहे. हा भाग वाळवंटी आहे. येथे झुडुपांशिवाय आणि वाळूशिवाय काहीच नाही. द रिपब्लिक ऑफ स्लोजमास्तान असे या देशाचे नाव आहे. या 11 एकर जागेवर हा देश तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या देशाच्या नावात जरी रिपब्लिक असले तरी या देशावर एक हुकूमशाहची सत्ता आहे. हा देश एका रेडिओ डीजेने तयार केला आहे. विशेष म्हणजे या हुकुमशाहच्या देशात 25,000 हून अधिक लोकांनी आश्रय घेतला आहे. आता हा सर्वच प्रकार डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा अचंबित करणार आहे.
या देशाचे कायदे पण विचित्र
स्लोजमास्तान हा काही इतर देशांसारखा नाही. हा देश विचित्र लोकांचा आणि सनकी हुकुमशाहाचा आहे. इथे त्याने विचित्र कायदे तयार केले आहेत. या देशात क्रॉस चप्पल घातल्यास शिक्षा होते. तर ई-मेल पाठवताना ‘Reply-all’ वर बंद घालण्यात आली आहे. येथे सुसाट कार इतर वाहनं चालवण्यास पूर्ण परवनगी आहे. या देशाचा राष्ट्रीय पशू हा रॅकून आहे.
असा तयार झाला देश
रेडिओ जॅकी रँडी याला जगभरात फिरण्याची आवड होती. पण 2020 मध्ये लॉकडाऊन लागले. त्यामुळे या रँडीचे तुर्कमेनिस्तान या देशात जाण्याचे स्वप्न भंगले. त्याचवेळी जर आपण दुसऱ्या देशात जाऊ शकत नसलो तरी स्वतःचा देश का बनवू शकत नाही असा विचार त्याच्या मनात आला. त्याने लागलीच 2021 मध्ये जवळपास 15 लाख रुपयांची एक वाळवंटी जमीन खरेदी केली. तिथे स्वत:चा झेंडा रोवला आणि तो देशाचा गाडा हाकत आहे.
पासपोर्ट, चलन आणि हो सैन्य ही
स्लोजमास्तान हा देश केवळ कागदावर आहे असे नाही. तर या देशाकडे स्वतःचे थोडे का असेना सैन्य आहे. येथे इतर देशातून येणार्या नागिरकांसाठी एक चेकपोस्ट आहे. या देशाचा झेंडा आणि चलन आहे. इतकेच नाही तर या देशाचे राष्ट्रगीतही आहे. तर सैन्य म्हणाल तर ती एक कमाल आहे. एक जुनी नौका ही नौसेना तर काही लोक हे सैनिक आहेत. या देशाची नागरिकता मोफत मिळते. गंमत म्हणून या देशाचे 120 जणांनी दुहेरी नागरिकत्व घेतले आहेत. या देशाची लोकसंख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे जर तुम्ही काही शुल्क भरले तर तुम्हाला या देशात सहज खासदार आणि राजदूत होता येते. पण त्यासाठी पैसे मोजावे लागतात. रँडी हा या देशाचा सुलतान आहे आणि 2027 मध्ये होणाऱ्या लहान देशांच्या ‘MicroCon’ या मंचावर हा देश प्रतिनिधित्व करणार आहे.