Parth Pawar: राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या दावणीला बांधल्याचा आरोप होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरून चांगलीच चर्चा रंगली आहे. या दोघांना अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पक्ष ताब्यात घ्यायचा होता, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. दरम्यान आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा सुरू असतानाच या दोघांच्याही अनुपस्थितीमुळे पुन्हा चर्चा रंगली.
सुनेत्रा पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांनी प्रफुल पटेल कुठे आहेत असं विचारलं असता त्यांनी तुम्हालाच माहिती, कधी येतात आणि कधी जातात अशी राजकीय भूवया उंचावणारी प्रतिक्रिया दिली. आता दोघांच्या चर्चा सुरू झाल्यानंतर खासदार पार्थ पवार यांनीच खुलासा केला आहेय त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, प्रफुल्ल पटेलजी आणि सुनील तटकरेजी यांच्याविरोधात पसरवल्या जाणाऱ्या बातम्या निराधार, तर्कहीन आणि काल्पनिक आहेत. त्यांचं समर्पण आणि अनेक दशकांचं नेतृत्व आजही आम्हाला मार्गदर्शक आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना कपोलकल्पित वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. </p
Baseless reports and speculative narratives targeting Praful Patel ji and Sunil Tatkare ji are nothing but fiction.
— Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) April 2, 2026
Their decades of unwavering commitment and leadership continue to guide us all.
Dragging such senior leaders into manufactured controversies is deeply unfortunate…
अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 18 दिवसांत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना सर्व अधिकार देण्याची मागणी केली होती, असा दावा रोहित पवार यांनी केला. रोहित पवार यांच्या मते, हे पत्र लिहिताना अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, पत्नी सुनेत्रा पवार (ज्यांची नियुक्ती नंतर उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून झाली) किंवा पक्षाच्या इतर आमदारांना विश्वासात घेतले गेले नव्हते. जेव्हा सुनेत्रा पवार यांना या पत्राबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांनीही निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्पष्ट केले की, 28 जानेवारी 2026 ते नवीन अध्यक्षांच्या निवडीपर्यंत कोणाकडूनही पक्षाच्या वतीने झालेला कोणताही पत्रव्यवहार 'शून्य' (null and void) मानला जावा. रोहित पवार यांनी असाही खळबळजनक आरोप केला की, अजित पवार यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांच्या निवासस्थानाबाहेर 'काळ्या जादू'चे विधी करण्याचा प्रयत्न झाला होता.
त्यांनी 27 जानेवारीच्या (अजित पवारांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी) बैठकीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच भाजप नेते पीयूष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून संबोधणे ही केवळ चूक नसून तो या कटाचा भाग असू शकतो, असा संशय त्यांनी व्यक्त केला. रोहित पवारांनी असा दावा केला की, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बारामती विमान अपघाताचा मुद्दा न उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, ज्यामुळे अनेक आमदार या विषयावर गप्प राहिले.
इतर महत्वाच्या बातम्या