महालक्ष्मी यात्रेतील पदयात्रींना मदत
कासा, ता. २ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी यात्रेनिमित्त अनेक भाविक पदयात्रा करून येतात. अशा भाविकांना लायन्स क्लब ऑफ डहाणूच्या वतीने गंजाड येथे पाणी, फराळी चिवडा वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ६,००० पाण्याच्या बाटल्या तसेच ३,००० फराळी चिवड्याचे पॅकेट्स वितरित करण्यात आले. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमामुळे यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळाला. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ डहाणूचे अध्यक्ष भूपेन बारी, सचिव जिग्नेश ठक्कर, खजिनदार नलिनभाई पटेल, माजी अध्यक्ष तेजस पोंदा, कुंजन पोंदा, संजय पाटील आदी उपस्थित होते.