वसईत हनुमान जयंती उत्साहात
esakal April 02, 2026 10:45 PM

वसईत हनुमान जयंती उत्साहात

वसई ता. २ (बातमीदार) : गुरुवारी (ता. २) वसई तालुक्यातील हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. या वेळी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हनुमानाच्या जयघोषात भाविक भक्तिमय वातावरणात तल्लीन झाल्याचे दिसून आले.

वसई पश्चिम दिवाणमान, माणिकपूर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सकाळपासून भाविकांची रीघ लागली होती. आरती, हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा, भजन, कीर्तन यासह धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक संस्थांनी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनदेखील ठिकठिकाणी केले असल्याचे दिसून आले. कामण येथे मध्यरात्रीपासून हनुमान भक्तीत भाविक दंग झाले होते. वालीव, नालासोपारा पश्चिम चक्रेश्वर मंदिर तसेच स्टेशन येथील हनुमान मंदिरात भाविकांच्या रांगा पहायला मिळाल्या. या वेळी भक्तांना गैरसोय होऊ नये म्हणून स्वयंसेवक नेमण्यात आले होते, तर सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता.
-------------
वसई : हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.