Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीचा सहावा सीजन (Bigg Boss Marathi 6)सध्या चांगलाच चर्चेत आहे.. सहाव्या सीजनचे आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे काटा गॅंग आणि टोळी गॅंगमध्ये शेवटचा कॅप्टन होण्याचा मान कोणाला मिळणार याकडे प्रेक्षकांसह सर्वांचेच लक्ष होते. शेवटची कॅप्टन सी मिळवण्यासाठी बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी प्रचंड खटाटोप केल्याचं दिसलं. काटा ग्रुपकडून तन्वी,दिपाली आणि रेवा तर टोळी गॅंगमधील अनुश्री, सागर यांच्यात कॅप्टनसीसाठी लढत पाहायला मिळाली. शेवटच्या कॅप्टनसीचा मान कोणाला मिळाला हे आता समोर आलं आहे.
सोशल मीडियावर सध्या बिग बॉसच्या प्रोमोची एकच चर्चा आहे. या प्रोमोत अनुश्री आणि राकेशमध्ये गरमा गरमी झाल्याच दिसतंय. कलर्स मराठीच्या या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत शेवटचा कॅप्टन सी ची माळ कोणाच्या गळ्यात पडली हे सांगितल्याच दिसतय. ही कॅप्टनसी काटा गँगमधील एका सदस्याला मिळाल्याचं समजतंय. या ग्रुपमध्ये तनवी दिपाली आणि रेवा आहेत. या तिघांपैकी एक जण कॅप्टन झालाय त्यामुळे राकेश बापटच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचं दिसलं.
बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात शेवटचा कॅप्टनशी पदाचा मान रेवा कौरासेने मिळवल्याचं कळतंय. रेवा वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात आलेली. घरात आल्यानंतर तिला कायम वाइल्ड कार्ड म्हणून हिणवलंही गेलं. बिग बॉस मराठीचं सहाव पर्व चांगलंच वादळी ठरताना दिसतंय. या सीजनमध्ये सुरुवातीचे 17 स्पर्धक आणि नंतर झालेल्या चार वाइल्ड कार्ड एन्ट्री असा लवाजमा होता. आता या सीझनमध्ये अवघे आठ स्पर्धक उरले आहेत. यात अनुश्री, राकेश ,तनवी, सागर, दिपाली, रेवा, विशाल, राखी यांचा समावेश आहे. यांच्यापैकी विजेता नेमका कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
View this post on Instagram
घरातील शेवटच्या आठवड्यातला कॅप्टन कोण होणार यावर अनेकजण कमेंट करून आपल्या आवडत्या स्पर्धकाचं नाव खाली नोंदवताना दिसले. अनेक जण तनवी च नाव घेत होते तर काही मी रेवाला सपोर्ट केल्याचे दिसलं. या प्रोमोच्या खाली अनेक जण रेवा कॅप्टन झाल्याचं बोलत आहेत.