Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?
esakal April 02, 2026 03:45 PM

अयोध्येच्या पावन भूमीत प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यापूर्वी हनुमानगढीच्या राजाचे दर्शन घेणे अनिवार्य मानले जाते. अयोध्येचे रक्षणकर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सिद्धपीठाबद्दल महंत राजू दास यांनी काही अशा 'गुप्त' गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून कोणाचाही थक्क होईल.

आज हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील या प्राचीन मंदिराची चर्चा सर्वत्र होत आहे. हनुमानगढीमध्ये हनुमानजी केवळ मूर्ती स्वरूपात नाहीत, तर ते तिथे प्रत्यक्ष वास्तव्यास आहेत, अशी श्रद्धा आहे.

पहाटेची 'ती' गुप्त पूजा आणि साक्षात दर्शन

महंत राजू दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमानगढीमध्ये एक अतिशय गूढ आणि प्राचीन परंपरा पाळली जाते. दररोज पहाटे हनुमानगढीच्या चार पट्टींमधील एक-एक पुजारी हनुमानजींची विशेष 'गुप्त पूजा' करतात.

असे मानले जाते की, या गुप्त पूजेच्या वेळी पवनपुत्र हनुमान पुजाऱ्यांना साक्षात दर्शन देतात. ही पूजा इतकी पवित्र आणि गोपनीय असते की त्याबद्दल बाहेरील जगाला फारशी माहिती नसते.

View this post on Instagram