अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट जाहीर केला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी ते होते. मात्र घटस्फोटानंतरही त्यांनी मैत्री कायम ठेवली आणि दोघांनी मिळून मुलांचं संगोपन करण्याचं ठरवलं. आता हृतिक आणि सुझान आपापल्या आयुष्यात पुढे गेले असून त्यांनी पुन्हा नव्याने प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे हृतिक अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय, तर दुसरीकडे सुझान आणि अर्सलान गोणी रिलेशनशिपमध्ये आहेत. या चौघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय आणि त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलसुद्धा केलंय. यावर आता सुझानचा सख्खा भाऊ आणि अभिनेता झायेद खान याने प्रतिक्रिया दिली आहे.
हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलानबद्दल काय म्हणाला झायेद?‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत झायेद म्हणाला, “आमचं कुटुंब समाजाच्या दबावाखाली येऊन वागणारं नाहीये. अशा गोष्टींच्या बाबतीत आम्ही इतरांपेक्षा अधिक सुशिक्षित आणि समजूतदार आहोत. मला माहीत आहे की अनेकांना ही गोष्ट विचित्र वाटू शकते. पण ठीक आहे. त्याने काही फरक पडत नाही. प्रेम ही खूप व्यापक संकल्पना आहे आणि त्या दोघांच्या मनात एकमेकांविषयी जो आदर आणि जी काळजी आहे, ती या संकल्पनेपेक्षा अधिक अर्थपूर्ण आहे. त्यांना उत्तम जोडीदार भेटले आहेत. मला सबा खूप आवडते आणि ती व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे. अर्सलान तर माझ्या छोट्या भावासारखाच आहे.”
ट्रोलर्सना उत्तर
View this post on Instagram
A post shared by Sussanne Khan (@suzkr)
“त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय सहन केलं, हे मी शब्दांत सांगू शकत नाही. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी परिस्थितीचा सामना केला आणि आयुष्यात पुढे जाऊन पुन्हा प्रेम मिळवलं, त्याबद्दल माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि प्रेम आहे. हे करणं खूप कठीण असतं. आयुष्यात अखेर काय महत्त्वाचं असतं? तर तुमच्यासोबत एक अशी व्यक्ती असावी जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता आणि जो तुमचं म्हणणं प्रामाणिकपणे ऐकून घेईल. जर तुमच्यासोबत असा जोडीदार नसेल, तर तुम्ही आयुष्यात पुढे कसं जाऊ शकाल,” असा सवाल त्याने केला. हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलान यांच्यात खूप चांगली मैत्री असून हे चौघं एकत्र पार्टी करतानाही दिसतात.