डोनाल्ड ट्रम्प यांनी फिरवले आशेवर पाणी, थेट जगाची झोप उडवारी धमकी, पुढील, दोन..
Tv9 Marathi April 02, 2026 12:45 PM

इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिना झाला. मात्र, तरीही युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनतेला संबोधित करताना अनेक दावे केले. डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपल्याची घोषणा आज करतील, असा अंदाज होता. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांनी यावेळीची चकवा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या युद्धादरम्यान अनेक मोठे दावे करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिका या युद्धात विजयाच्या अत्यंत जवळ आहे. आम्ही पुढच्या दोन ते तीन आठवड्यात इराणवर मोठा हल्ला करू. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश संकटात आहेत. होर्मुज खाडीबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आम्हाला होर्मुज खाडीची गरज नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान जगासाठी अत्यंत धक्कादायक नक्कीच आहे.

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, होर्मुज खाडी एकदा सुरू झाली की, वाढलेल्या तेलाच्या किमती नियंत्रणात येतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी धमकी देत म्हटले की, पुढील दोन ते तीन आठवडे इराणकरिता अत्यंत कठीण आणि धोकादायक असणार आहेत. अमेरिका आणि इराणवर पूर्ण ताकदीने हल्ला करेल.

आता आम्ही त्यांना थेट अश्मयुगात परत पाठवणार आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावरून स्पष्ट होते की, अमेरिका आता इराणवर घातक हल्ले करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपण्याबद्दल घोषणा करणार अशी आशा जगाला होती. पण त्यांनी युद्ध अधिक घातक होण्याचे संकेत दिले. अमेरिकन सैन्य मध्य-पूर्वेच्या दिशेने सातत्याने पुढे सरकत आहे.

अमेरिकेकडून मोठ्या धमक्या मिळत असतानाही खंबीरपणे इराण उभे आहे. अमेरिकेने जर मोठे हल्ले इराणवर केले तर इराणही मोठे हल्ले इस्त्रायल आणि आखाती देशांवर करू शकतो. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या या धमकीने जगाचे टेन्शन वाढल्याचे बघायला मिळतंय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.