मिस्टर राज ठाकरे सर, नर्गिसने मानले मनसेप्रमुखांचे आभार; पोलिसांकडून अपेक्षाभंग, पण मनसैनिक मदतीला धावले
अजय माने April 03, 2026 06:13 PM

मुंबई : राज्यकर्त्यांनी, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावले पाहिजे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अनेकदा प्रशासनात, पोलिसाकंडूनही नागरिकांना मदत मिळत नाही. त्यावेळी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी मदतीला धावून येतात. मुंबईतील एका रीलस्टार लाही तसाच अनुभव आल्याने तिने थेट व्हिडिओच शेअर केला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नर्गिस फ्रूटवाला हिने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसे विभागाध्यक्ष संदेश देसाई यांचे आभार मानले आहेत. मनसेने आपल्याला केवळ मदतच केली नाही तर माणुसकी म्हणून देखील सहकार्य केले. जे पोलिसांनी (Mumbai) केले नाही ते मनसेने केले, अशा शब्दात नर्गिसने (Reel) भावना व्यक्त कतर व्हिडिओ पोस्ट केला आहे.  

रिलस्टार नर्गिस आपला 4 लाख रुपयांच्या किमतीचा कॅमेरा कॅबमध्ये विसरली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर तिने संबंधित कॅब चालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने कॅमेरा परत देण्यास नकार दिल्याचा आरोप नर्गिसने केला आहे. या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी नर्गिसने चेंबूर RCF, आणि MIDC पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवले. पोलिसांनी कॅब चालकाला फोन केला पण माझ्याकडे काही नाही, असे उत्तर त्याने दिले. त्यामुळे, पोलिसांकडून तिची तक्रार नोंदवली गेली नाही असे नर्गिस फ्रूटवाला हिने म्हंटले आहे. त्यांनतर तिच्या संपर्कातील एकाने मनसेची मदत घेण्यास सांगितले आणि नर्गिस थेट मनसेच्या शाखेत पोहोचली. 

मनसेच्या वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई आणि शाखाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. नवी मुंबई परिसरात कॅब चालकाचा त्यांनी शोध लावला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी चालकाच्या घराची झडती घेतली आणि घरातून कॅमेरा ताब्यात घेतला. अवघ्या 24 तासांत नर्गिसचा कॅमेरा परत मिळाल्याने तिला आनंद तर झाला, पण तिने लगेच व्हिडिओ करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विभागअध्यक्ष संदेश देसाई आणि शाखाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांचे आभार मानले. 

रूपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स, अंजली दमानियांनी कॉल रेकॉर्ड्स काढले, मंत्र्यांचीही नावं घेतली!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.