शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नांदेडमध्ये घडलेल्या हाणामारीमुळे अख्ख् शहर हादरलं. कॅनाल रोडवर मध्यरात्री उशिरा झालेली ही घटना गँगवॉर असल्याची चर्चा असून रक्तरंजित राड्यात तिघांचा मृत्यू झाला. एका आरोपीचा घटनास्थळी मृत्यू तर दुसऱ्या तिसऱ्या आरोपीचा दवाखान्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भयानक घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम सह वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले. पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. मात्र घटनेमुळे शहरातील नागरिक अतिशय भयभीत झाले आहेत.
डी-मार्टजवळ रक्तरंजित थरार
नांदेड शहरातील डीमार्ट परिसरातील कॅनॉल रोडवर परिसरात मध्यरात्री रात्री दीड वाजताच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून हा प्रकार घडला असं समजतं. नांदेड जिल्ह्याच्या अभिलेख (रेकॉर्ड वरील )वरील काही गुन्हेगारांमध्ये तलवार व खंजीरने मारामारी झाली. त्या घटनेत एका बाजूचे अर्जित सिंग व दुसऱ्या बाजूचे सय्यद अवेज व महम्मद अरबाज असे तीन लोक मृत्य़ूमुखी पडले. कॅनाल रोडवरील डी-मार्टजवळ अचानक काही तरुणांमध्ये वाद झाला,पाहता पाहता या वादाचं रूपांतर तुंबळ हाणामारीत झालं.
साई गेहरवाल आणि अर्जित सिंह यांच्या गँगमध्ये ही हाणामारी झाली. त्याच्यात कोणत्या कारणावरून वाद होता, ही हाणामारी नेमकी कशामुळे झाली ते अजून अस्पष्ट आहे. पण त्यामध्ये तिघांचे बळी गेले. या घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसराची नाकेबंदी करून तपास सुरू करण्यात आला असून दोन्ही बाजूच्या काही आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिस अधिकारी अधिक तपास करत आहेत, तसेच पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं.