भारताला आता होर्मुझचे टेन्शन नाही, दुसऱ्या मिडल इस्टची तयारी सुरु, एलपीजी आणि इंधनाचा वारेमाप पुरवठा होणार
Tv9 Marathi April 04, 2026 11:45 PM

इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत बॉटलनेक तयार झाला आहे. इराणच्या मित्र राष्ट्रांना येथून प्रवासाची मुभा असली तर तेल पुरवठा पहिल्या सारखा होत नाहीए..या दरम्यान अमेरिकेच्या मॅक्सिकोच्या आखातात ( युएस गल्फ ) मोठा डाव रचला जात आहे. येथे दुसरे मिडल ईस्ट तयार करण्याची खेळी आहे. जेथून एलपीजी आणि कच्चे तेल जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याची तयारी सुरु आहे. भारतासाठी हा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग असणार आहे. असा दावा केला जात आहे की अमेरिकेच्या या गल्फमध्ये आतापासूनच अनेक मोठे उद्योजक पैसे ओतत आहेत.

तेल कंपन्यांची लागली रांग

जगातील सर्वात मोठ्या एनर्जी कंपन्या अमेरिकेच्या या अल्ट्रा -डीप वॉटर प्रोजेक्टमध्ये मोठा भाग खरेदी करण्यासाठी रांगा लावून उभ्या आहेत. युरोपची दिग्गज कंपनी TotalEnergies आणि Shell सोबत लंडनची BP आणि स्पेनची Repsol देखील या शर्यतीत सामील आहेत.
‘शेननडोह’ फिल्डचे सध्याचे मालक त्यांचा ५१ टक्के शेअर विकण्यास राजी आहेत. यासाठी येत्या काही आठवड्यात बोली लागण्याची शक्यता आहे. मध्य पूर्वेतील आणि आशियातील मोठे तेल उत्पादक देखील या शर्यतीत सामील झाले आहेत. ज्यामुळे भारतासाठी भविष्यात इंधन आणि एलपीजीचा पुरवठा होण्याचा एक नवा मार्ग उघड होऊ शकतो.

येथून किती निघणार कच्चे तेल ?

हा कोणता साधारण ऑईल साठा नाही. हा समुद्राच्या त्या खोलीवर आहे जेथे जाणे आव्हानात्मक काम आहे. येथे इंधन आणि गॅसचे साठे ३०,००० फूट खोलीवर आहेत. येथे प्रेशर २०,००० पाऊंड प्रति वर्ग इंचापर्यंत पोहचू शकते. तरीही येथे जुलैपासून उत्पादन सुरु झाले आहे. आणि रोज १,००,००० बॅरल तेल काढले जात आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा भाग युद्ध क्षेत्रापासून हजारो मैल दूर आहे. येथून तेलाच्या पुरवठ्यासाठी होर्मुझ सारख्या खतरनाक मार्गांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

भारतासाठी का आहे गेम चेंजर

मध्य पूर्वच्या संकटाने संपूर्ण जगाला घाबरवले आहे. होर्मुझमध्ये झालेल्या समुद्री ब्लॉकेड दरम्यान अमेरिकेचा हा भाग जगासाठी तेलाचे नवे केंद्र बनत आहे. मध्य पूर्वेतील तणावाने जर इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. अमेरिकेकडून होणारे अधिकचे उत्पादन मार्केटला संतुलित राखण्यास मदत करणार आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. आणि अशात एलपीजीपासून पेट्रोलपर्यंत भारताला मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे. अमेरिकेसारख्या स्थिर देशाकडून पुरवठा होणे भारतासाठी एनर्जीची सुरक्षिततेची मोठी गॅरंटी होऊ शकते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.