Jalna News: लग्नसराईमुळे शहरात सोने-चांदी खरेदीमध्ये पुन्हा वाढ; दरातील स्थिरतेमुळे उत्साह ; महिनाभरात सोने २५, तर चांदीत ५२ हजारांची घसरण
esakal April 05, 2026 01:45 PM

जालना: लग्न सराईमुळे सोने-चांदीच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीमुळे सराफा बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने खरेदीला ब्रेक लागला होता. आता दरात स्थिरता असल्याने ग्राहकांचा प्रतिसादही चांगला मिळत असून सराफा बाजारात महिनाभरानंतर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने चांदीचे दरात सारखी चढ-उतार झाल्याचे दिसून आले. गेल्या महिनाभरात सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने खरेदीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. सोन्याच्या दरात तब्बल २५ हजारांची घट झाली असून चांदीतही ५२ हजारांची घसरण नोंदविण्यात आली आहे.

Jalna News: मनपाच्या उद्या होणाऱ्या सभेत घेतला जाणार निर्णय, दहा लाखांची तरतूद; अतिक्रमण काढण्यासाठी; आउटसोर्सिंग मनुष्यबळ

सध्या १० ग्रॅम सोन्याचे दर दीड लाख तर एक किलो चांदीचे दर २ लाख ३८ हजार रुपये आहे. दरम्यान, आता लग्नसराईचे दिवस आहेत. त्यातच दरातही स्थिरता आहे. त्यामुळे पूर्वी खरेदी टाळणारे ग्राहक आता बाजारात येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

लग्न समारंभासाठी दागिने खरेदीस पसंती

लग्न समारंभात विशेषतः नवरीच्या दागिन्याला सर्वाधिक पसंती आहे. दर स्थिर राहिल्यास पुढील काही दिवसांतही खरेदीचा उत्साह कायम राहील, असा अंदाज शहरातील सराफा व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे.

Premium|IPL Business Model : आयपीएलचे अर्थकारण; मीडिया राइट्स, प्रायोजकत्व आणि सेंट्रल पूलमधून अब्जावधींचा खेळ

"मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. युद्धामुळे अस्थिरता निर्माण होऊन सोने-चांदीच्या दरात मोठा परिणाम झाला. ग्राहकांनाही दर वाढीचा अंदाज येत नव्हता त्यामुळे खरेदीस ब्रेक लागला होता. आता मात्र लग्नसराई आणि त्यात दर स्थिर आहेत. यामुळे ग्राहक खरेदीस पसंती देत आहेत."

- शरद जैन, सराफा व्यापारी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.