Kangana Ranaut to Return with a New Story Queen: खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'क्विन' (Queen) चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) हिट ठरला. आता 'क्विन' चित्रपटप्रेमींसाठी (Entertainment news) एक आनंदाची बातमी. 12 वर्षांनंतर 'क्विन' सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलचं नाव आणि कथा पूर्णपणे वेगळी असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. लेटेस्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिल्ममेकर्सने चित्रपटाच्या शीर्षकाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. चाहते तसेच चित्रपट प्रेमींना या सिनेमाचे नाव 'क्विन 2' असेल अशी अपेक्षा होती. पण आता नवीन फिल्म टायटलचा विचार केला जात आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, कंगना रनौतच्या आगामी चित्रपटाचे शीर्षक 'क्वीन फॉरएव्हर' असू शकते, असा काहींचा अंदाज आहे.
बॉलिवूड हंगामाच्या एका अहवालानुसार, फिल्ममेकर्सना 'क्वीन फॉरएव्हर' या चित्रपटाची थीम आवडली. हा चित्रपट फक्त सिक्वेल नसून, या सिनेमात आपल्याला वेगळी कथा पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या चित्रपटाची कथा वेगळी जरी असली तरी यात, स्वत:ला शोधणं, स्वातंत्र्य आणि स्वत: ला ओळखणं या मुख्य गोष्टी असणार आहे. सिक्वेलमधील कंगनाचे पात्र तिच्या आधीच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी असणार आहे.
'क्विन' या सिनेमात अभिनेत्रीने एक निरागस, छोट्या शहरातील मुलीची भूमिका साकारली होती. तर, दुसऱ्या पार्टमध्ये कंगना एका शहरी, कॉन्फिडेंट तरुणीची भूमिका साकारणार आहे. तिचे विचार 'क्विन' चित्रपटातील 'राणी'पेक्षा थोडे वेगळे असणार आहे. दरम्यान, स्टोरी असे काही वळण घेईल की, तिला पुन्हा एकदा स्वत:च्या शोधात घेऊन जाईल. यावेळी तिचा हा प्रवास परदेशी शहरांऐवजी भारतातील विविध मेट्रो शहरांमध्ये घडेल, यामुळे चित्रपटातील स्टोरीला वेगळं वळण मिळेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा विकास बहल करणार आहेत. परंतु, या चित्रपटाच्या कलाकारांच्या निवडीत मोठा बदल होणार आहे. ओरिजिनल कास्टमधून केवळ कंगना रनौत या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमध्ये दिसणार आहे. तर, इतर कलाकारांच्या जागी नवे चेहरे दिसतील. विशेषत: थिएटर बॅकग्राऊंड असणाऱ्या कलाकारांना या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी संधी दिली जाणार आहे. माहितीनुसार, या चित्रपटाची शूटिंग मुंबईतील स्टूडिओमध्ये होणार आहे. या स्टूडिओमध्ये नॉर्थ इंडियन शहरातील काही घरांचे सेट तयार करण्यात येणार आहे.