Traditional Farming: कोंडव्यात जपला जातोय पारंपरिक शेतीचा इतिहास; रमेश गुजर यांचा अनोखा उपक्रम, घरच झाले संग्रहालय!
esakal April 05, 2026 09:45 PM

-गुलाब पठाण

किडगाव: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जिथे जुनी शेती औजारे भंगारात जात आहेत. तिथे कोंडवे गावातील प्रगतशील शेतकरी रमेश गुजर यांनी या औजारांना नवं आयुष्य देत पारंपरिक शेतीचा इतिहास जपण्याचा प्रेरणादायी उपक्रम चालवला आहे.

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार; राज्य शासनाची सुधारित आखणीला मंजुरी, नेमका कसा असेल मार्ग..

वर्ये येथील वेण्णा नदीच्या उतारावर रमेश गुजर वास्तव्यास आहेत. त्यांचे सारजा नावाचे रसवंती गुऱ्हाळही आहे. उसाचा रस पिताना येणाऱ्या जाणाऱ्यांना शेती औजारे पाहता यावीत, म्हणून त्यांनी आपल्याच घरात शेतीचे हे संग्रहालय उभे केले आहे. श्री. गुजर यांनी पारंपरिक शेती औजारे जमा करून त्यांचा अनोखा संग्रह तयार केला आहे.

नांगर, पाबर, कुळव, कोळपे, ऊस फोडण्याचे डुबे, पास, चाडेनळे, लाकडं कापायची शंभर ते दीडशे वर्षांपूर्वीची करवत, काटवट, रवी अशा अनेक वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतात. विहिरीतील पाणी बाहेर काढण्यासाठी पूर्वी मोटेचा उपयोग केला जात होता, तशी जुनी मोटही या ठिकाणी पाहायला मिळते. पाणी ओढण्याचे रहाट अशा अनेक वस्तूंचा या संग्रहात समावेश आहे. या प्रत्येक औजारामागे शेती संस्कृतीची एक जिवंत कहाणी दडलेली आहे.

Pune Airport News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! चार नव्या शहरांसाठी पुण्याहून उड्डाण; उन्हाळी हंगामात १५ नवीन स्लॉटना मंजुरी.. घरच झाले संग्रहालय

पूर्वी शेतकरी याच साधनांच्या मदतीने कष्टाने शेती करत होते. काळाच्या ओघात आधुनिक यंत्रसामग्रीमुळे ही औजारे वापरातून बाद झाली. मात्र या साधनांमध्ये आपल्या परंपरेचा आणि मेहनतीचा ठेवा असल्याची जाणीव ठेवून गुजर यांनी त्यांचे जतन केले आहे. आज हा संग्रह केवळ वस्तूंचा साठा नसून, शेतीच्या इतिहासाची ओळख करून देणारे एक छोटेसे संग्रहालयच बनले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.