अफेअरबद्दल सांगितलं तेव्हा काय होती पियुष मिश्रा यांच्या पत्नीची प्रतिक्रिया? म्हणाले, 'ती म्हणाली की...'
esakal April 05, 2026 09:45 PM

बॉलिवूडचे लोकप्रिय गायक, अभिनेते आणि गीतकार पियुष मिश्रा सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. त्याचं कारण आहे त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र. पियुष यांच्या ‘तुम्हारी औकात क्या है, पीयूष मिश्रा’ या आत्मचरित्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्ष तर सांगितलंच आहे. सोबतच त्यांच्या चुकादेखील सांगितल्यात. त्यांच्या अफेअरबद्दल जेव्हा त्यांच्या पत्नीला समजलं होतं तेव्हा त्या त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया होती हे त्यांनी या पुस्तकात लिहिलंय.

पियुष मिश्रा यांच्या पुस्तकात ते म्हणतात, 'आता ते एक चांगले पती आहेत; पण आधी तसं नव्हतं. शुभंकर मिश्राशी संवाद साधताना ते म्हणाले, “आता मी एक चांगला पती आहे; पण पूर्वी तसा नव्हतो. तेव्हा मी अजिबात जबाबदार नव्हतो आणि लग्न ही खूप मोठी जबाबदारी असते. वयाच्या २० व्या वर्षी जेव्हा तुम्ही प्रेमात पडता, तेव्हा त्यात काहीच लॉजिक नसतं; पण वयाच्या ३५ नंतर तुम्ही अशा व्यक्तीवर प्रेम करता, जी तुमच्याबरोबर वृद्ध व्हायला तयार असते. माझ्या पत्नीने मला स्वीकारलं आणि माझ्याबरोबर आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला, हीच माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या आहे.'

View this post on Instagram

A post shared by Piyush Mishra (@officialpiyushmishra)