शेतकऱ्यांनी मांडल्या उपमुख्यमंत्र्यांपुढे व्यथा
esakal April 05, 2026 09:45 PM

माळेगाव, ता. ५ : बारामती तालुक्यातील पणदरे, धुमाळवाडी आणि पवईमाळ परिसरात पाऊस व भीषण गारपीटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी (ता.) बाधित शिवाराची पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
पणदरे परिसरातील नुकसानीची पाहणी करताना पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गणेश मुळीक, रोहन जगताप आणि कुलभूषण कोकरे या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. गारपिटीमुळे केळी, आंबा, ऊस आणि पालेभाज्यांचे सुमारे ५० लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विभागाने पीक विम्याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
माळेगावचे संचालक योगेश जगताप यांनी फळबागा आणि चारा पिकांच्या नुकसानीची माहिती दिली. शेतकरी दशरथ धुमाळ यांनी माळेगाव कारखाना आणि कृषी विभागाने तातडीने सहकार्य करण्याची विनंती केली. या पाहणी दौऱ्यावेळी माळेगावच्या उपाध्यक्ष संगीता
कोकरे, संदीप बांदल, विश्वास देवकाते, किरण तावरे, योगेश जगताप, मंगेश जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


03180

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.