भविष्यात माणगांव तालुक्याला भरघोस निधी देणार
esakal April 05, 2026 09:45 PM

भविष्यात माणगाव तालुक्याला भरघोस निधी देणार; जि.प.अध्यक्ष मंगेश वाकडीकर
भाजपतर्फे उसर बु. गावच्या जोडरस्त्याचे उद्घाटन
माणगाव, ता. ५ (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील उसर बुद्रुक येथील जोडरस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी भविष्यात तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
२ एप्रिल रोजी साई पंचायत समिती गणातील उसर बुद्रुक येथील जोडरस्त्याचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या वेळी बोलताना वाकडीकर यांनी सांगितले की, रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवरील विकासाचा अनुशेष भरून काढण्यावर भर दिला जाणार आहे. भारतीय जनता पार्टीने सामान्य कार्यकर्त्याला अध्यक्षपदाची संधी देत विकास शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू साध्य केला आहे. १७५ कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, प्रलंबित कामे मार्गी लावण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास भाजप तालुकाध्यक्ष परेश सांगले, संजय आप्पा ढवळे, रचना थोरे, रुपाली कासारे, किसन महाडिक, बाबुराव चव्हाण, सुधीर म्हामुणकर, संतोष यादव, अनिल दांडेकर यांसह अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मंडळ व मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.