Success Story : मनात जिद्द असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करण्याची हिंमत तयार येते. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरीही कठोर मेहनत आणि अभ्यास करून अनेकांनी मोठं यश मिळवलेलं आहे. तुम्ही गुगलवर अशा यशोगाथा सर्च केल्या तर त्या लगेच मिळतील. आता देशातील कोट्यवधी तरुणांना प्रेरित करणारी अशीच एक यशोगाथा समोर आली आहे. एका मुलीने शेळ्यांना सांभाळत-सांभाळात इयत्ता 12 वीच्या परीक्षेत तब्बल 99.60 टक्के मिळवले आहेत. तिची ही कामगिरी पाहून देशभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
इयत्ता बारावीच्या परीक्षेत तब्बल 99.60 टक्के मिळवणाऱ्या या विद्यार्थिनीचे नाव नाव्या मिना असे आहे. घरातील परिस्थिती खूपच बेताची असूनही तिने जिद्दीने अभ्यास केला. मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर तिने हे गुण मिळवले आहेत. काव्या मिना ही मुळची राजस्थानमधील आहे. राजस्थानच्या जयपूर आणि सिकर या दोन जिल्ह्यांच्या सीमाेवर हे एक छोटसं गाव आहे. या गावात नाव्या मिना आपल्या कुटुंबासोबत राहते. तिने राजस्थान बोर्डातून इयत्ता बारावीत सर्वाधिक गुण मिळवले आहेत. इयत्ता 12 वीच्या परीक्षेत ती राजस्थान बोर्टातून सर्वप्रथम आली आहे.
हे गाव रेनवाल किशनगड तहसीलच्या हद्दीत येतं. या गावात जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. दळवणवळणाची सोय नाही. परतु नाव्याने मिळवलेले यश समजताच संपूर्ण राजस्थानातून लोक तिला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. नाव्या शेतामध्ये आपल्या आईसोबत राहते. तिला चार बहिणी आणि एक भाऊ आहे. तिचे वडील गुजरातमध्ये जाऊ काम करतात. पैसे कमवून ते घरी पाठवतात. सात लोकांचे पालनपोषण होण्यासाठी ते गुजरातमध्ये दिवसरात्र मेहनत करतात.
महिनाभर मेहनत करून नाव्याच्या वडिलांना 20 ते 25000 रुपये मिळतात. नाव्याच्या घरी 14 शेळ्या आहेत. शाळेतून घरी आली की ती रोज शेळ्या सांभाळायला शेतात जायची. हे काम करतानादेखील ती परीक्षेचा अभ्यास करायची. त्याचेच फळ म्हणून आज तिला बारावीच्या परीक्षेत 99.60 टक्के गुण मिळाले आहेत. तिला आता आयएएस व्हायचे आहे. देशभरातील लोक तिला शुभेच्छा देत आहेत.